MS Dhoni and wife Sakshi casting vote in Ranchi reaches video viral : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी रांची येथील मतदान केंद्रावर पोहोचले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की चाहत्यांनी आपल्या आवडत्या क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी त्याला चारही बाजूंनी घेरले होत. मात्र, जवळच उपस्थित असलेल्या पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने धोनीने केंद्रावर पोहोचून मतदान केले.
महेंद्रसिंग धोनीची झारखंड निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावर मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी त्याचे फोटो वापरण्यास आयोगाने त्याची संमती घेतली आहे. धोनीला स्वीप (सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते.
एमएस धोनी आयपीएल २०२५ साठी सज्ज –
माही पुन्हा एकदा आयपीएलमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी मेगा ऑक्शनपूर्वी त्याला चेन्नई सुपर किंग्जने ‘अनकॅप्ड प्लेयर’ श्रेणीत कायम ठेवले आहे. सीएसकेने धोनीला अवघ्या ४ कोटींमध्ये रिटेन केले. मात्र, धोनी पुढे खेळत राहणार की येणारा सीझन त्याचा शेवटचा सीझन असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्याला पुन्हा ॲक्शनमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा – Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
२०२१ मध्ये रद्द करण्यात आलेला नियम यावेळी पुन्हा लागू करण्यात आला, ज्यानुसार जर एखाद्या कॅप्ड भारतीय खेळाडूने पुढील हंगामाच्या सुरुवातीपासून गेल्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसेल आणि त्याच्याकडे बीसीसीआयचा केंद्रीय करार नसेल तर तो अनकॅप्ड खेळाडू होईल. अनकॅप्ड खेळाडूच्या नवीन नियमानुसार चेन्नई सुपर किंग्जने धोनीला स्वस्तात रिटेन केले. धोनीशिवाय सीएसकेने ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), मथिशा पाथिराना (१२ कोटी), शिवम दुबे (१२ कोटी) आणि रवींद्र जडेजा (१८ कोटी) यांना कायम ठेवले आहे.