सर्वाधिक धावा फटकावणारा भारतीय कर्णधार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केलेली ६५ धावांची तडाखेबंद खेळी भारताचा दारुण पराभव टाळू शकली नाही. मात्र याच खेळीमुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या विक्रमाच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
धोनीने १५२ एकदिवसीय सामन्यांत ५२७८ धावा करत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मागे टाकला. अझरुद्दीनने १७४ सामन्यांत ५२३९ धावा केल्या होत्या. धोनीने ५८.६४च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. अझरुद्दीनची सरासरी ३९.३९ इतकी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पा गाठणारा धोनी हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी अझरुद्दीन आणि सौरव गांगुली (५०८२ धावा) यांनी ही किमया केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा