BCCI on Mahendra Singh Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज (७ जुलै) ४२ वर्षांचा झाला. धोनी हा क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने तीन आयसीसी विजेतेपदे जिंकली आहेत. धोनीने आपल्या खेळाने जगभरातील करोडो क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. धोनीसाठी बीसीसीआयला एक नियम तोडावा लागला होता. काय आहे तो किस्सा जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एम.एस. धोनी झारखंडचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होता ज्याला वयाच्या २३व्या वर्षी त्याला टीम इंडियामध्ये बोलावल्याची बातमी मिळाली. या यष्टिरक्षक फलंदाजाने त्या संधीचे सोने करत मैदानावर सर्वोतम कामगिरी करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ५ एप्रिल २००५ रोजी धोनीने त्याच्या ५व्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १४८ धावा केल्या. नंतर, त्याने आपल्या ५व्या कसोटीतही १४८ धावांची शानदार खेळी खेळली. माहीचे हे कसोटी शतक पाकिस्तानविरुद्ध फैसलाबादमध्येही झाले होते.

या शानदार खेळी करणार्‍या क्रिकेटपटूने या दोन ओपनिंग सेंच्युरीने इतके माध्यमांमध्ये इतके मथळे केले की तो नंतर टीम इंडियाचा ‘भविष्य’ बनला. महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) प्रतिभा संशोधन विकास विभागाचा (TRDW) शोध होता. त्याची प्रतिभा पाहता या कार्यक्रमाशी संबंधित वयाचा नियम शिथिल करावा लागला.

दिलीप वेंगसरकर हे भारतातील सर्वोत्तम निवडकर्त्यांपैकी एक मानले जातात जेव्हा स्पॉटिंग टॅलेंटचा विचार केला जातो. या माजी कर्णधाराचा २००६ ते २००८ या कालावधीत निवड समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा येणार्‍या निवडकर्त्यांसाठी बेंचमार्क ठरला, कारण महेंद्रसिंग धोनी त्याचा निवडकर्ता असताना कर्णधार झाला. दिलीप वेंगसरकर यांना विश्वास होता की ते निवड समितीच्या अध्यक्षपदाला न्याय देऊ शकले कारण ते बीसीसीआयच्या टॅलेंट रिसर्च डेव्हलपमेंट विभागाशी (टीआरडीडब्ल्यू) संबंधित होते, ज्याने धोनीसारख्या क्रिकेटपटूंच्या प्रतिभेचा शोध घेतला. TRDW मात्र आता अस्तित्वात नाही.

हेही वाचा: Ashes 2023: मार्क वुडचा अफलातून यॉर्कर अन् उस्मान ख्वाजाच्या दांड्या गुल, पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलिया संकटात; पाहा Video

अशा प्रकारे धोनीसाठी नियमांशी संबंधित नियममोडला गेला

महेंद्रसिंग धोनीचा वयाच्या २१व्या वर्षी बीसीसीआयच्या TRDW योजनेत समावेश करण्यात आला होता, पण यासाठी वयाची मर्यादा १९ वर्षे होती. या मागे एक अतिशय रंजक कथा आहे. वास्तविक, बंगालचा माजी कर्णधार प्रकाश पोद्दार यांच्या सांगण्यावरून धोनीचा TRDW मध्ये समावेश करण्यात आला होता. पोद्दारच्या सांगण्यावरून वेंगसरकर यांनी ठरवले की, “गुणवान खेळाडूच्या आड वय येता कामा नये.”

पोद्दार हा जमशेदपूरला अंडर-१९चा सामना पाहण्यासाठी गेला होता. त्याचवेळी बिहारचा संघ शेजारील केनन स्टेडियमवर एकदिवसीय सामना खेळत होता आणि चेंडू वारंवार स्टेडियमच्या बाहेर पडत होते. यानंतर पोद्दार आतापर्यंत कोण एवढे स्टेडियमच्या बाहेर बॉल मारतोय याची उत्सुकता होती. जेव्हा त्यांनी माहिती काढली तेव्हा त्यांना धोनीबद्दल कळले. वेंगसरकर म्हणाले, “वयाच्या २१व्या वर्षी पोद्दारच्या सांगण्यावरून धोनीला टीआरडीडब्ल्यू कार्यक्रमाचा भाग बनवण्यात आले होते.” त्यांनी सांगितले की TRDW ची सुरुवात माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी केली होती. मात्र, दालमिया निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ते बंद करण्यात आले.

हेही वाचा: MS Dhoni Birthday: आपला माही ४२ वर्षांचा झाला! कॅप्टन कूलपासून ते निवृत्तीपर्यंत जाणून घ्या त्याचा जीवनप्रवास

विश्वचषक २०१९ मध्ये खेळलेला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना

विश्वचषक-२०१९ मध्ये महेंद्रसिंग धोनीची संथ फलंदाजी टीकाकारांच्या निशाण्यावर होती. भारताच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर तो क्रिकेटपासून दूर राहिला. त्याच्या निवृत्तीचीही अटकळ जोरात होती. अखेर १५ ऑगस्ट २०२० रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीच्या बातमीनंतर जगभरातील त्याचे चाहते निराश झालेले दिसले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni birthday bcci had to break this rule for dhoni at the age of 23 showed the sky to pakistan avw
Show comments