टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी सध्या दुबईमध्ये कुटुंबासोबत एन्जॉय करत आहे. त्याचवेळी, नववर्षाच्या दिवशीही माहीने झगमगणाऱ्या दुबईचा आनंद लुटला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी साक्षी आणि मुलगी उपस्थित होत्या. साक्षीने धोनी आणि मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये माही त्याच्या मुलीसोबत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये आनंदी दिसत आहे. त्याचबरोबर दुबईही नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये चमकताना पाहायला मिळत आहे.
एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर तो अनेक प्रसंगी कुटुंबासोबत मस्ती करताना दिसत आहे. त्याचवेळी, माहीला आयपीएल २०२३ मध्ये मैदानात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र आयपीएलमध्ये व्यस्त होण्यापूर्वी माही कुटुंबासह दुबईत नवीन वर्ष साजरे केले. धोनीचा फॅमिलीसोबतचा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. साक्षीने दुबईच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या काही व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत.
हेही वाचा –
मिस्टर ३६० डिग्रीने २०२२ साठी सर्वांचे मानले आभार –
टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनेही २०२२ साठी ट्विटरवर सर्वांचे आभार मानले आहेत. यासोबतच त्याने सर्व चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
स्वत:चा एक फोटो शेअर करत त्याने ट्विटरवर लिहिले की, ”नवीन वर्ष २०२३ मध्ये येण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही. या वर्षी तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मी तुमचा आभारी आहे. तसेच आणखी एका मोठ्या वर्षाची आशा आहे, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.”