करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतातील आघाडीची टी २० लीग IPL चे आयोजनदेखील लांबणीवर ढकलण्यात आले आहे. या स्पर्धेत आपली चमक दाखवून टीम इंडियात कमबॅक करण्याची धोनीकडे चांगली संधी आहे असे बोलले जात होते. याच बाबतीत माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन याने मत व्यक्त केले आहे.

VIDEO : अरे देवा! अनुष्काला झालंय तरी काय… बघा तुम्हाला कळतंय का?

“धोनीला नक्की काय हवं आहे हे माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तोच सगळ्यांना सांगू शकेल. निवृत्तीचा निर्णय हा पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे. सध्याची स्थिती पाहता एक गोष्ट नक्की की करोनाचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थीतीत IPL चे आयोजन होणं दूरच राहिलं. मूळ जीवनपद्धती रूळावर यायलाच वेळ लागेल… आणि धोनीबाबत म्हणाल तर त्याने काय करावं हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे”, असे अझरूद्दीन म्हणाला.

‘टीम इंडिया’च्या स्टार खेळाडूला एलिस पेरीसोबत हवी ‘डिनर डेट’

“संघातील खेळाडूंची निवड करताना निवडकर्ते तुमची कामगिरी पाहतात. दीर्घ विश्रांतीनंतर अचानक मैदानात उतरून तुम्ही चांगली कामगिरी करूच शकत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे केवळ सरावाने सारं काही होणं शक्य नाही. मैदानावर उतरून सामने खेळणं अत्यंत जरूरीचं असतं. कारण या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यासाठी तुम्हाला मधल्या काळात सामने खेळण्याचा दांडगा अनुभव हवा. तरच तुम्ही इतरांच्या तुलनेत तरू शकता. एकंदरीत धोनीला दीर्घ काळानंतर पुनरागमन करणं खूप कठीण जाईल”, असे रोखठोक मत अझरूद्दीनने व्यक्त केले.