MS Dhoni cutting the cake at the trailer launch of Let’s Get Married: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र त्यानंतरही धोनीच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही घट झालेली नाही. प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये धोनीची लोकप्रियता प्रचंड आहे. अलीकडेच एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले. आयपीएलनंतर धोनी त्याच्या प्रोडक्शन हाऊस धोनी एन्टरटेन्मेंटमध्ये व्यस्त आहे.

अलीकडेच धोनी त्याच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत बनत असलेल्या तमिळ चित्रपट लेट्स गेट मॅरीडच्या ट्रेलर आणि ऑडिओ लॉन्च कार्यक्रमासाठी चेन्नईला पोहोचला. या कार्यक्रमाशी संबंधित एक व्हिडीओ सध्या चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एमएस धोनी दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता योगी बाबूसोबत मस्ती करताना दिसत आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

एमएस धोनी योगी बाबूसोबत लेट्स गेट मॅरीडच्या ट्रेलर लॉन्चचा केक कापला –

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान एमएस धोनी आणि दक्षिण अभिनेता योगी बाबू एकत्र केक कापताना दिसले. व्हिडिओमध्ये धोनी केकचा तुकडा घेऊन तो स्वत: खाताना दिसत आहे. त्यावेळी योगी बाबू धोनीला केक खाऊ घालण्यासाठी चमचा शोधत होता. यावेळी धोनी मस्करीच्या मूडमध्ये दिसला. यानंतर दोघांनी एकमेकांना केक खाऊ घातला आणि हसताना दिसले.

धोनी आयपीएल २०२४ चा हंगाम खेळणार –

आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वीच हा सीझन धोनीचा शेवटचा सीझन असू शकतो, अशा बातम्या येत होत्या. मात्र, पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर धोनी म्हणाला की, त्याच्या चाहत्यांसाठी त्याला आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळायचा आहे. आयपीएल २०२३ मध्ये धोनीने १२ डावात १८२.४५ च्या स्ट्राइक रेटने १०४ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Duleep Trophy 2023 Final: हनुमा विहारीच्या दक्षिण विभागाने पटकावले विजेतेपद, पश्चिम विभागाचा ७५ धावांनी उडवला धुव्वा

आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या कार्यक्रमादरम्यान धोनीने असेही सांगितले की, तामिळनाडूने त्याला दत्तक घेतले आहे. धोनी म्हणाला होता, माझे कसोटी पदार्पण चेन्नईमध्ये झाले, माझी सर्वोच्च कसोटी धावसंख्या चेन्नईमध्ये आहे, जेव्हा क्रिकेटचा विचार केला तर चेन्नईमध्ये अनेक गोष्टी घडल्या ज्याचा मला अभिमान आहे. २००८ मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा तामिळनाडूने मला दत्तक घेतले होते, हे विसरू नका.

Story img Loader