MS Dhoni Gulabi Sharara dance video viral : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज एमएस धोनीचा एक डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोन्ही दोन पहाडी गाण्यांवर नाचताना दिसत आहे. यापैकी सर्वांना परिचीत असणाऱ्या ‘गुलाबी शरारा’ या गाण्यावरही थिरकताना दिसत आहेत. ४३ वर्षीय माही अजूनही आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनीचा जन्म जरी रांचीमध्ये झाला असला, तरी तो मूळचा उत्तराखंडमधील आहे. त्याचे कुटुंब मूळचे उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत धोनीसह काही लोक गोल रिंगण करुन पहाडी गाण्यावर नाचत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओ धोनी हसत हसत नाचत आहे. धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत. देशभरात धोनीच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे धोनी कुठेही गेला, तर त्याचे फोटो लगेच व्हायरल होतात. कारण चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच आतुर असतात. धोनी मैदानात नेहमी षटकार-चौकारांचा पाऊस पाडताना दिसतो. तो अशा प्रकारे डान्स करताना क्वचितच दिसतो.

या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग त्यांची पत्नी साक्षीसोबत पहाडी गाण्यांवर स्थानिक लोक आणि कलाकारांसोबत नृत्याचा आनंद घेताना दिसत आहेत. धोनी त्याच्या हॉटेलमधील जागेत लोकांसोबत मस्ती करत आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पाचवेळा जेतेपद पटकावून दिले आहे.

हेही वाचा – SMAT 2024 : गुजरातच्या खेळाडूने इंदूरमध्ये पाडला चौकार-षटकारांचा पाऊस, अवघ्या ३६ चेंडूंत उत्तराखंडविरुद्ध झळकावले शतक

u

एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. तो आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनी आयपीएल २०२५ मध्येही फटकेबाजी करताना दिसणार आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. आयपीएल २०२४ पूर्वी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni dance on pahari song and gulabi sharara song in rishikesh with wife sakshi and folk dancers video viral vbm