भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा सामना चाहत्यांसाठी दर्जेदार क्रिकेटची पर्वणी ठरणार आहे. अंतिम लढतीचे तिकीट पक्के करणाऱ्या या सामन्याचा शिलेदार ठरू शकतील अशा खेळाडूंचा शोध चाहत्यांनी ‘गुगल’च्या माध्यमातून घेतला आहे आणि या शोधात अग्रणी आहेत ऑस्ट्रेलियाचा हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी.  महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी शोध घेण्यात येणाऱ्या खेळाडूंमध्ये महेंद्रसिंग धोनीचे नाव अग्रक्रमावर असल्याचे ‘गुगल’ने आपल्या पाहणीद्वारे म्हटले आहे. धोनीनंतर विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्याविषयी जाणून घेण्यात क्रिकेटप्रेमी नेटिझन्सना उत्सुकता असल्याचे गुगलने म्हटले आहे.