भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ला कळवला आहे. धोनीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. धोनीने आपला निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवल्यानंतर बीसीसाआयने ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली.
फोटो गॅलरी- धोनीचा कसोटी क्रिकेटला अलविदा..
धोनीने आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत ९० कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये ४८७६ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. आगामी काळात तो एकदिवसीय आणि टी-२० सामनेच खेळणार आहे. एकदिवसीय क्रिकेटकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत शेवटची कसोटी अजून बाकी असतानाच धोनीने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच धोनीचा निर्णय त्वरित लागू होणार असून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पुढील कसोटी सामन्याचे नेतृत्त्व विराट कोहली करणार असल्याचेही बीसीसीआयने ट्विट केले आहे.
News Alert – MS Dhoni has chosen to retire from Test Cricket with immediate effect #MSD #Captain
— BCCI (@BCCI) December 30, 2014
News Alert – Virat will be the captain for the 4th and Final Test against Australia #MSD #AusvsInd
— BCCI (@BCCI) December 30, 2014