भारतीय संघाने इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक मालिकेत विजय प्राप्त केल्यानंतर सर्वत्र ‘टीम इंडियाची’ स्तुती होऊ लागली. त्यात कॅप्टन कुल धोनीला याविजयाचे श्रेय देत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने, भारतीय क्रिकेटमध्ये धोनीने चमत्कार केला असल्याचे म्हटले आहे. आयसीसीच्या संघ क्रमवारीत सुद्धा भारत अव्वल स्थानावर आहे. “धोनी सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. तो अनेक विक्रमांचाही मानकरी आहे. त्याच्यासाठी क्रिकेट खेळणे आणखी भरपूर बाकी आहे. त्यामुळे यापुढेही धोनीकडून अनेक चमत्कार अनुभविण्यास मिळतील” असे सौरभ गांगुलीने स्पष्ट केले.
“धोनी संघातील खेळाडूला योग्यरितीने पाठींबा देतो. त्याच्या कर्णधारतेखाली सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि रोहीत शर्मा यांच्याही क्षमतेत वाढ झाली आहे. त्यांच्यातही संघाचे नेतृत्व करण्याचा आत्मविश्वास निर्माण होत आहे.” असेही गांगुली पुढे म्हणाला. 

Story img Loader