रोहित शर्माला उत्कृष्ट फलंदाज बनविण्याचे श्रेय हे कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिले पाहिजे, असे माजी कर्णधार सौरव गांगुली याने म्हटले आहे.
सौरव म्हणाला, “रोहितला आपल्यातील गुणवत्तेची कल्पना नव्हती. परंतु, धोनीने सतत त्याला संधी देवून त्याच्यातील आत्मविश्वासात भर टाकली. सध्या रोहित भारतीय संघातील एक चांगला सलामीवीर म्हणून पुढे येते आहे. शंभर एकदिवसीय सामने खेळूनही रोहित आजवर एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याच्या फलंदाजीची शैली पाहता तो एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून होण्याची चिन्हे आहेत.” 

Story img Loader