इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्ती विषयी चर्चांना जोर धरु लागला. धोनीने आपल्या निवृत्तीविषयी अधिकृत वक्तव्य केलेलं नसलं तरीही निवड समितीने यापुढील मालिकांमध्ये ऋषभ पंत हा भारतीय संघात पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल हे जाहीर केलं. विंडीज दौऱ्यात ऋषभ पंतला टी-२०, वन-डे आणि कसोटी अशा तिन्ही स्पर्धांमध्ये संधी देण्यात आली, मात्र त्यावा हवातसा संधीचा लाभ उचलता आला नाही. धोनी आणि ऋषभ पंत यांच्यात सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये अनेकदा तुलना होत असते. मात्र धोनी हा आपला मार्गदर्शक असून मी त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो हे ऋषभ पंतने स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – धोनीला सन्मानाने निवृत्ती मिळायला हवी – अनिल कुंबळे

“माझ्याही मनात धोनीविषयी होणाऱ्या तुलनेचा विचार येतो, पण हे खूप कठीण आहे. मी लगेचच त्याच्यासारखा खेळाडू बनेन असा विचार करणं चुकीचं आहे. धोनी माझा मार्गदर्शक आहे, मी नेहमी त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, मात्र मैदानात उतरण्याआधी मी त्या गोष्टींचा कसा अवलंब करतो हे माझ्यासाठी महत्वाचं आहे.” Bombay Times ला दिलेल्या मुलाखतीत ऋषभ बोलत होता.

कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मी धोनीसोबत होणाऱ्या तुलनेचा विचार करत राहिलो तर गोष्टी अवघड होतील. मी नेहमी सोप्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक सामन्यात माझ्याकडून चांगला खेळ कसा होईल हा एकच विचार मनात असतो. ऋषभने संघात आपल्यावर असलेल्या जबाबदारीवर भाष्य केलं. विंडीज दौऱ्यात ऋषभला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही, त्यामुळे आगामी आफ्रिकेविरुद्ध मालिकेत पंत आपल्या कामगिरीत सुधारणा करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.