MS Dhoni Knee Injury Successful : चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी १ जूनला गुडघ्याची शस्त्रक्रिया केली. आयपीएलच्या १६ व्या हंगामात धोनीला गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त केलं होतं. आयपीएलची फायनल जिंकल्यानंतर ४८ तासांच्या आतच धोनीने मुंबईच्या डॉक्टरांना संपर्क केला. धोनीने ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याच निर्णय घेतला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी बुधवारी ३१ मे रोजी मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल झाला होता. आता गुरुवारी सकाळी आठ वाजता त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीनं दिनशॉ पारदीवाला यांना या समस्येबाबत सांगितलं. दिनशॉ स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक्स विभागात तज्ज्ञ असून रुग्णालयात स्पोर्ट्स मेडिसिनचे निर्देशकही आहेत. तसच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचा उपचारही ते करत आहेत. ते ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचीही त्यांनी २०१९ मध्ये शस्त्रक्रिया केली आहे.
मुंबईला जाण्याआधी धोनीने चेन्नई सुपरकिंग्जच्या मॅनेजमेंट टीमसोबत याबाबत चर्चा केली. फ्रॅंचायजीने मुंबईत धोनीसोबत त्यांच्या टीमचे फिजिशियन डॉक्टर मधु थोट्टापिल्ली यांना पाठवलं. याआधी बुधावरी चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या दुखापतीबाबत माहिती दिली होती. धोनीला आयपीएलच्यादरम्यान डाव्या गुडघ्याच्या दुखापतीला सामोरं जावं लागलं. धोनी प्रत्येक सामन्यात गुडघ्याला पट्टी लावून खेळायचा. धोनीने खालच्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. याबाबत धोनीला विचारण्यात आल्यावर, धोनीनं म्हटलं होतं की, तो खूप जास्त धावू शकत नाही. विश्वनाथनने पीटीआयशी बोलताना म्हटलं होतं की, धोनीला गुडघ्याची दुखापत झाली आहे. तो वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन पुढील निर्णयाबाबत सांगणार आहे.”