MS Dhoni And Joginder Sharma Photo Goes Viral: भारताने २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. टीम इंडियाचा हा विजय ऐतिहासिक ठरला होता. भारताने अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता. या विजयाचा अजून एक हिरो वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मा होता. धोनीने नुकतीच जोगिंदरची भेट घेतली आहे. पण धोनी आणि जोगिंदरची (Joginder Sharma) ही भेट १२ वर्षांनंतर झाली आहे, त्यांच्या या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२००७च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात जोगिंदरने शेवटचे षटक टाकले आणि १३ धावांचा बचाव केला. जोगिंदरची क्रिकेट कारकीर्द मात्र फार काळ टिकली नाही आणि तो लवकरच संघातून बाहेर पडला. सध्या जोगिंदर हरियाणा पोलिसामध्ये डीएसपी आहेत.

हेही वाचा –IND vs SL: “मी फार काही बोलणार नाही…” १४ चेंडूत एकही धाव न घेता भारताचा सामना टाय झाल्याने रोहित शर्मा पाहा नेमकं काय म्हणाला?

MS Dhoni आणि जोगिंदर शर्माच्या भेटीचा फोटो व्हायरल

सध्या धोनी आणि जोगिंदरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जोगिंदरने युनिफॉर्म घातलेला आहे आणि धोनी त्याच्या नव्या लूकमध्ये आहे. फोटोंमध्ये दोघेही हस्तांदोलन करताना आणि एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून यूजर्स दोघांचेही कौतुक करत आहेत. जोगिंदरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा फोटो आणि फोटोंचा व्हीडिओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा – IND vs SL: पहिला वनडे सामना टाय झाला तरी सुपर ओव्हर का झाली नाही? काय सांगतो ICCचा नियम?

MS Dhoni साठी 2007 वर्ल्डकप हिरो जोगिंदर शर्माची पोस्ट

जोगिंदरने धोनीच्या फोटोंच्या शेअर केलेल्या या व्हिडिओला ‘ऐ यार सुन यारी तेरी…मुझे जिंदगी से भी प्यारी है.’ हे गाणं आहे. अमिताभ बच्चन आणि शशी कपूरवर यांच्यावर चित्रित केलेलं हे गाणं १९७९ मध्ये आलेल्या सुहाग चित्रपटातील आहे. हा व्हीडिओ पोस्ट करत याच्या कॅप्शनमध्ये जोगिंदरने लिहिले की, ‘बऱ्याच दिवसांनी एमएस धोनीला भेटून खूप छान वाटलं. तब्बल १२ वर्षांनंतर झालेली ही भेट थोडी वेगळी आणि मजेशीर होती.

हेही वाचा – Rohit Sharma: हिटमॅन नंबर वन! रोहित शर्माने रचला मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला कर्णधार

टीम इंडिया व्यतिरिक्त जोगिंदर धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये टीम चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. तो या संघाकडून दोन हंगाम खेळला. जोगिंदर शर्माच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने भारतासाठी चार एकदिवसीय आणि ४ टी-२० सामने खेळले. जोगिंदरने टी-२० मध्ये चार विकेट घेतल्या. एकदिवसीय सामन्यात त्याने एक विकेट घेतली. जोगिंदरने २४ जानेवारी रोजी टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर तो संघात परतला नाही. प्रथम श्रेणीत त्याने एकूण ७७ सामने खेळले आणि २९७ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने लिस्ट-ए मध्ये ११५ विकेट घेतल्या आहेत. तर टी-२० मध्ये ६१ विकेट घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni meets joginder sharma dsp of haryana police and 2007 world cup final hero photo goes viral on social media bdg