भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याचा जुना सहकारी युवराज सिंगची भेट घेतली. युवराज सिंगच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून या गोष्टीचा खुलासा झाला आहे. हे दोघे एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान भेटले होते. युवराज सिंग आणि धोनी सोफ्यावर बसून एकमेकांशी बोलत आहेत, तेव्हा हा फोटो काढण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात धोनीने सांगितले, ”मला शेवटचा टी-२० सामना चेन्नईमध्ये खेळायला आवडेल. मात्र, शेवटचा सामना आगामी आयपीएलमध्ये होईल किंवा पुढच्या पाच वर्षात होईल, हे माहीत नाही. मी नेहमीच माझ्या क्रिकेटचे नियोजन केले आहे. मी भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना रांची येथे खेळला होता. मी माझा शेवटचा टी-२० सामना चेन्नईत खेळण्याची आशा करतो.”
आयपीएल २०२१ पर्यंत चेन्नई सुपर किंग्जचा भाग असणाऱ्या रॉबिन उथप्पाने संकेत दिले आहेत, की रवींद्र जडेजा धोनीच्या फ्रेंचायझीचा उत्तराधिकारी असू शकतो. पुढील हंगामासाठी चेन्नईने जडेजाला १६ कोटी आणि धोनीला १२ कोटी देत रिटेन केले आहे. उथप्पा पुढे म्हणाला, ”मला जे समजले त्यावरून मला वाटते की एमएस धोनी निवृत्त झाल्यावर भविष्यात रवींद्र जडेजा फ्रेंचायझीचे नेतृत्व करेल. त्याला योग्य ते फळ मिळेल.”
हेही वाचा – लग्नानंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल कोणाचे शेजारी होणार माहितीये का? नाव वाचून बसेल धक्का!
जडेजा आणि धोनी व्यतिरिक्त सीएसकेने मोईन अली आणि +तुराज गायकवाड यांना कायम ठेवले आहे. अलीला ८ कोटी तर रुतुराजला ६ कोटी मिळाले.