आयपीएलच्या मागील मोसमातील फिक्सिंगप्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मुदगल समितीने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या गुप्त अहवालात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव असण्याची शक्यता आहे.
इंग्रजी वृत्तपत्र ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, मुदगल समितीने फिक्सिंगमध्ये सक्रिय सहभागी असलेल्यांच्या नावांचे गुपीत पाकीट सर्वोच्च न्यायालयाला दिले. या गुपीत पाकिटात कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव आहे. त्यामुळे आयपीएल फिक्सिंगमध्ये महेंद्रसिंग धोनीचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
आयपीएल फिक्सिंग: सहा खेळाडूंवर संशयाची सुई; एक जण आताही भारतीय संघात!
तसेच न्यायालयासमोर मुदगल समितीने दिलेल्या अहवालानुसार, एका क्रीडा मासिकासाठी कार्यरत एक पत्रकार भारतीय खेळाडूच्या बोलण्याच्या ध्वनिमुद्रणाशी संबंधित आहे. हा पत्रकार या खेळाडूचा आवाज ओळखू शकतो. इतकेच नाही तर, विश्वचषक विजयी भारतीय संघाचा हा खेळाडू भाग होता आणि सध्याच्या भारतीय संघातही तो आहे. संबंधित पत्रकाराने या खेळाडूचे नाव उघड करण्यास नकार दिला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर संशयाची सुई धोनीवरही आली आहे.
आयपीएल फिक्सिंग: त्या बंद पाकिटात धोनीचे नाव?
आयपीएलच्या मागील मोसमातील फिक्सिंगप्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मुदगल समितीने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या गुप्त अहवालात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव असल्याचे म्हटले जात आहे.
First published on: 13-02-2014 at 10:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni named in secret justice mudgal probe report