आयपीएलच्या मागील मोसमातील फिक्सिंगप्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मुदगल समितीने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या गुप्त अहवालात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव असण्याची शक्यता आहे.
इंग्रजी वृत्तपत्र ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, मुदगल समितीने फिक्सिंगमध्ये सक्रिय सहभागी असलेल्यांच्या नावांचे गुपीत पाकीट सर्वोच्च न्यायालयाला दिले. या गुपीत पाकिटात कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव आहे. त्यामुळे आयपीएल फिक्सिंगमध्ये महेंद्रसिंग धोनीचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
आयपीएल फिक्सिंग: सहा खेळाडूंवर संशयाची सुई; एक जण आताही भारतीय संघात!
तसेच न्यायालयासमोर मुदगल समितीने दिलेल्या अहवालानुसार, एका क्रीडा मासिकासाठी कार्यरत एक पत्रकार भारतीय खेळाडूच्या बोलण्याच्या ध्वनिमुद्रणाशी संबंधित आहे. हा पत्रकार या खेळाडूचा आवाज ओळखू शकतो. इतकेच नाही तर, विश्वचषक विजयी भारतीय संघाचा हा खेळाडू भाग होता आणि सध्याच्या भारतीय संघातही तो आहे. संबंधित पत्रकाराने या खेळाडूचे नाव उघड करण्यास नकार दिला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर संशयाची सुई धोनीवरही आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा