MS Dhoni new look Photo viral : महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानात असो वा नसो, त्याची नेहमीच चर्चा होत असते. यावेळी धोनी त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. या नव्या लूकमध्ये धोनी लांब केस ठेवलेला दिसत नाही. पण, या लूकमध्ये धोनीचा एक वेगळाच स्वॅग दिसतो आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत, ज्यावर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. भारताला दोन वेळ विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपले लांब केस सोडून एक नवीन स्टाइलिश लुक स्वीकारला आहे, जो प्रसिद्ध स्टायलिस्ट अलीम हकीमने केला आहे.

धोनीने भारतीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्याचे केस लांब होते. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफही त्यांच्या केसांचे चाहते होते. कालांतराने माहीने त्याचा लूक बदलला. धोनीने अनेक लूक दिले आहेत आणि यावेळी तो पुन्हा नव्या लूकमध्ये दिसत आहे. महेंद्रसिंग धोनीची फॅन फॉलोईंग अप्रतिम आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. त्यामुळे चाहते धोनीला खेळताना पाहण्यासाठी आयपीएलची वाट पाहतात.

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसके संघाने पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. धोनीच्या याच फ्रँचायझीने त्याच्या नव्या लूकचे फोटो पोस्ट केले आहेत. धोनीने आपले केस फारसे लहान केले नसून आपली हेअरस्टाईल बदलली आहे. माहीने केस रंगवले आहेत. हिरवा चष्मा घातलेला धोनी या फोटोंमध्ये खूपच छान दिसत आहे. सीएसके फ्रेंचाइजीने या फोटोंना कॅप्शन देताना लिहिले, “एक्सट्रीम कूल!”

हेही वाचा – IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूची उपकर्णधारपदी लागली वर्णी

धोनीसाठी बदलला नियम –

यंदा आयपीएल २०२५ साठी मोठा लिलाव होणार आहे. या लिलावापूर्वी प्रत्येक संघाला त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर यावेळी आयपीएलमध्ये धोनीसाठी एक नियम बदलण्यात आला आहे. धोनीसाठी अनकॅप्ड खेळाडूंबाबतचा नियम बदलण्यात आला आहे जेणेकरून चेन्नईने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येईल. त्यामुळे फ्रँचायझीचा बराच पैसा वाचेल आणि धोनीही संघात कायम राहील.

हेही वाचा – IND vs BAN तिसरा टी-२० सामना रद्द होण्याची शक्यता, जाणून घ्या काय आहे कारण?

चेन्नई सुपर किंग्ज धोनीला ठेवणार कायम –

नवीन नियमानुसार, जे खेळाडू पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत आणि बर्याच काळापासून बीसीसीआयच्या केंद्रीय कराराचा भाग नाहीत, ते यावर्षी अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळतील. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. अनकॅप्ड खेळाडूला कायम ठेवण्यासाठी फ्रँचायझी ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करू शकत नाही. आतापर्यंत चेन्नई धोनीला १२ कोटी रुपये देत होती पण आता धोनीला कायम ठेवल्यास त्याला जास्तीत जास्त ४ कोटी रुपये द्यावे लागतील.