IPL 2023 CSK vs RR : आयपीएल २०२३ मध्ये बुधवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ धावांनी पराभव केला. सीएसकेला शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती. जगातला सर्वोत्तम फिनिशर असलेला महेंद्रसिंह धोनी खेळपट्टीवर होता. परंतु तो केवळ एकच धाव घेऊ शकला परिणामी हा सामना चेन्नईने गमावला. राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने उत्तम यॉर्कर फेकत चेन्नईच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली. धोनी षटकार ठोकून सामना जिंकून देईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पंरतु, संदीपने कमाल केली आणि राजस्थान रॉयल्सला शानदार विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर धोनीने संदीप शर्माचं कौतुक केलं. दरम्यान, धोनी शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकू न शकल्याने धोनी ट्रोल होऊ लागला आहे.
धोनीच्या टीकाकारांनी धोनीचं एक जुनं ट्वीट उकरून काढलं आहे. हे ट्वीट व्हायरल करून धोनीला ट्रोल करण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर सुरू आहे. धोनीने २४ मार्च २०१४ रोजी केलेलं हे ट्वीट आहे. या ट्वीटमध्ये धोनीने लिहिलं आहे की, “कोणता संघ जिंकला याने काही फरक पडत नाही, मी येथे करमणुकीसाठी आहे.”
तर दुसऱ्या बाजूला धोनीच्या चाहत्यांसाठी मात्र हे ट्वीट सुखावणारं आहे. राजस्थानविरुद्ध चेन्नईच्या पराभवानंतर धोनीच्या चाहत्यांनी देखील ही ट्वीट शेअर केलं आहे. धोनीच्या चाहत्यांच्या मते तो आजही त्यांच्या करमणुकीसाठी खेळतोय हीच मोठी गोष्ट आहे.
हे ही वाचा >> कगिसो रबाडाचा पहिल्याच सामन्यात धमाका! एकच विकेट घेतली अन् रचला इतिहास, ‘या’ दिग्गज गोलंदाजाचा मोठा विक्रम मोडला
शेवटच्या षटकात काय झालं?
धोनीसमोर गोलंदाजी करण्याचं संदीप शर्मापुढ आव्हान होतं. धोनीच्या फलंदाजीला पाहून कोणताही गोलंदाज दबावात येतो, हे सत्य सर्वांना माहित आहे. पहिला चेंडू संदीपने वाईड फेकल्यावर धोनी या षटकात काही ना काही कमाल करेल, असं चाहत्यांना वाटलं होतं. पण दबाव इतका होता की, संदीपने दुसरा चेंडूही वाईड फेकला. त्यानंतर सीएसकेला विजयासाठी ६ चेंडूत १९ धावांची आवश्यकता होती. चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. संदीप शर्माही दबावात असल्याचं दिसत होतं.