Who is Virat Kohli favorite cricketer rapid fire video: : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने १८ ऑगस्ट २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्षे पूर्ण केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर करणारा विराट आजही तितक्याच उर्जेने फलंदाजी करताना दिसतो. विराटने सचिन तेंडुलकरला गेल्या वर्षीच्या विश्वचषकात सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या बाबतीत मागे सोडले, जेव्हा त्याने ५० वे शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्षे पूर्ण केल्याच्या खास प्रसंगी विराटने काही रंजक प्रश्नांची उत्तरे दिली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या खास प्रसंगी विराट कोहलीने स्टार स्पोर्ट्सला खास ‘रॅपिड फायर’ मुलाखत दिली, जिथे त्याने १६ प्रश्नांची उत्तरे दिली. या मनोरंजक सत्रादरम्यान कोहलीने त्याच्या आवडत्या आयपीएल प्रतिस्पर्ध्याचा खुलासा केला. त्याने मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील त्याच्या आवडत्या आयपीएल प्रतिस्पर्ध्याचे नाव सांगितले. त्याने आपला आवडता प्रतिस्पर्धी संघ म्हणून बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची टीम निवडली.

विराट कोहलीचा आवडता क्रिकेटर कोण?

जेव्हा विराट कोहलीला एमएस धोनी आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यातील आवडत्या क्रिकेटपटूची निवड करण्याचा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा कोहलीने हसत हसत उत्तर दिले. तो म्हणाला, ‘दोन्ही.’ यानंतर त्याला आवडते क्रिकेट स्टेडियमबद्दल विचारण्यात आले. ज्यामध्ये विराटला चिन्नास्वामी आणि ॲडलेडचा पर्याय देण्यात आला होता. ज्यापैकी किंग कोहलीने आवडते स्टेडियम म्हणून चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमचे नाव निवडले.

हेही वाचा – Rohit Sharma : विसरभोळ्या रोहितबद्दल माजी बॅटिंग कोचचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘तो फक्त ड्रेसिंग रुममधील ‘ही’ गोष्ट विसरत नाही’

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध केले होते आंतरराष्ट्रीय पदार्पण –

१८ ऑगस्ट २००८ रोजी विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर त्याने टीम इंडियासाठी सलामी दिली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने २२ चेंडूत १२ धावा केल्या, ज्यात एका चौकाराचा समावेश होता. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा टीम इंडियाची धुरा महेंद्रसिंग धोनीच्या हाती होती. ज्या सामन्यातून विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यातील भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील ९ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे जो अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni or ab de villiers who is virat kohlis favorite cricketer rapid fire video viral vbm