भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये एक कसोटी सामना आणि तीन टी २० सामन्यांची मालिका पार पडली. त्यानंतर, मंगळवारपासून (१२ जुलै) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीदेखील लंडनमध्ये आहे. भारतीय संघाचे क्रिकेट सामने बघण्यासाठी तो आवर्जून उपस्थित राहत आहे. इतकेच नाही तर त्याने आपली एक खास ‘गँग’ तयारी केली आहे. या गँगमध्ये पार्थिव पटेल आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे.

भारताच्या आभारताच्या आजी-माजी यष्टीरक्षकांचा हा गट मुक्तपणे एकत्र भटकंती करताना दिसत आहे.. भारताचा माजी यष्टिरक्षक पार्थिव पटेलने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि ऋषभ पंत यांच्यासोबत वेळ घालवतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिघेही लंडनच्या रस्त्यांवर भटकंतीचा आनंद लुटताना दिसत आहेत. ‘कीपर्स कॉर्नर’ अशी टॅग लाईन देऊन पटेलने हा फोटो शेअर केला आहे. हाच फोटो ऋषभ पंतनेदेखील आपल्या शेअर केला आहे.

MS Dhoni and Rishabh Pant
पार्थिव पटेल आणि ऋषभ पंत यांनी शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला गेला होता. तेव्हापासून तो तिथेच आहे. नुकत्याच पार पडलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तो राफेल नदाल आणि सानिया मिर्झाचे सामने बघताना दिसला होता. त्याचे हे फोटो विम्बल्डनने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले होते. त्यानंतर त्याने भारतीय संघाच्या टी २० आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यालाही उपस्थिती दर्शवली.

Story img Loader