विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीचे चाहते धोनीमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. त्याने इतक्यात निवृत्त होऊ नये, अशी मतं व्यक्त करत आहेत. पण धोनी मात्र विश्वचषकानंतर अद्याप क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. धोनीने विश्वचषक स्पर्धेनंतर दोन महिन्यांची विश्रांती घेतली होती.
T20 World Cup 2020 : ‘या’ १६ संघांना मिळालं विश्वचषक स्पर्धेचं तिकीट
धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली, त्या कालावधीत त्याने काश्मीरमध्ये जाऊन भारतीय लष्कराला सेवा दिली. त्यानंतर धोनी मैदानात परतेल असे वाटत असतानाच तो नोव्हेंबरपर्यंत विश्रांती घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धोनी मैदानावर परतण्याऐवजी निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा पुन्हा रंगू लागली. त्यातच काही दिवसांपूर्वी ट्विटरवर Dhoni Retires असा एक हॅशटॅग ट्रेंड झाल्यामुळे निवृत्तीची पुन्हा चर्चांना उधाण आले. या संदर्भात भारताचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा यालाही प्रश्न विचारण्यात आला.
आता क्रिकेटच्या मैदानावरही दिसणार सनी लिओनीचा जलवा
भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी काही दिवसांपू्र्वी धोनीबाबत सांगितले होते की धोनीला त्याच्या निवृत्तीबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. भारतीय संघाच्या निवडीत मात्र आम्ही तरूण यष्टीरक्षकांना संधी देणार आहोत. या साऱ्या मुद्द्यांवरून रोहितला धोनीच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. धोनीने निवृत्ती घ्यायला हवी की नाही? याबाबत रोहितने बोलणे टाळले, पण त्याने एक दमदार उत्तर दिलं. “असल्या गोष्टींबाबत (धोनीच्या निवृत्तीबाबत) आमच्या कानावर तरी काही चर्चा आल्या नाहीत. तुम्हीच (प्रसारमाध्यमे) अशा चर्चांना खतपाणी घालता”, असे रोहितने प्रश्नावर पत्रकारांना सुनावलं.
दरम्यान, BCCI अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गांगुलीने एका पत्रकार परिषदेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले. “धोनीने आपल्या कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. जेव्हा तुम्ही शांतपणे बसाल आणि धोनीने केलेल्या विक्रमांची यादी पहाल, तेव्हा तुम्हीच म्हणाल की चॅम्पियन इतक्या लवकर संपत नाहीत. जोवर मी BCCI चा अध्यक्ष आहे, तोपर्यंत साऱ्यांचा योग्य मान राखला जाईल”, असे गांगुलीने स्पष्ट केले.