महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने तिन्ही आयसीसी चषक उंचावले आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं होतं. जगभरात कॅप्टन कूल अशी ओळख असलेल्या धोनीला त्याच्या चाहत्यांनी थाला (तला – leader) हे नवीन नाव दिलं आहे. धोनीने एखादी मोठी कामगिरी केली, मुलाखतीत हजरजबाबीपणाचं दर्शन घडवलं किंवा सामाजिक क्षेत्रात काहीतरी केल्यावर त्याचे चाहत्या तला किंवा तला फॉर अ रिजन हा हँशटॅग ट्रेंड करतात. तला हा एक तमिळ शब्द असून त्याचा अर्थ लीडर, प्रमुख किंवा नेतृत्व करणारा असा होतो. दरम्यान, धोनीने नुकतंच एका कार्यक्रमात जर्सीसाठी ७ हा क्रमांक का निवडला यामागचं कारण स्पष्ट केलं. त्यानंतर पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर तला फॉर अ रिजन (Thala for a reason) हा ट्रेण्ड सुरू झाला आहे.
धोनीच्या देदिप्यमान कामगिरीमुळे आणि त्याच्या जगभर असलेल्या असंख्य चाहत्यांच्या मागणीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कुठल्याही खेळाडूला सात नंबरची जर्सी न देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कुठलाही भारतीय खेळाडू या क्रमांकाची जर्सी परिधान करून खेळू शकणार नाही. बीसीसीआयने सचिन तेंडुलकरच्या १० नंबरच्या जर्सीनंतर धोनीची ७ नंबरची जर्सी निवृत्त केली आहे.
दरम्यान, धोनीने एका मुलाखतीमध्ये जर्सीसाठी ७ हा क्रमांक का निवडला यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. धोनीचं हे कारण ऐकून त्याच्या चाहत्यांनी समाजमाध्यमांवर तला फॉर अ रिजन (Thala for a reason) हा हँशटॅग ट्रेण्ड केला आहे. धोनी म्हणाला, मी पृथ्वीवर पाऊल ठेवण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी ७ जुलै १९८१ हा दिवस ठरवला होता. मी सातव्या महिन्यातील सातव्या दिवशी जन्मलो. १९८१ हे वर्ष होतं. ८ मधून १ हा अंक वजा केला तर ७ हे उत्तर येतं. म्हणून मी ७ नंबरची जर्सी निवडली. जेव्हा मला विचारण्यात आलं की, तू कुठल्या क्रमांकाची जर्सी परिधान करणार? तेव्हा जर्सीचा क्रमांक ठरवणं माझ्यासाठी खूप सोपं होतं.
महेंद्रसिंग धोनीची कोट्यवधींची फसवणूक!
माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्याविरुद्ध रांची येथील न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. दिवाकरने २०१७ मध्ये धोनीबरोबर जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी करार केला होता. त्याच्या अटींचे पालन करण्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे धोनीने १५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.