महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने तिन्ही आयसीसी चषक उंचावले आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं होतं. जगभरात कॅप्टन कूल अशी ओळख असलेल्या धोनीला त्याच्या चाहत्यांनी थाला (तला – leader) हे नवीन नाव दिलं आहे. धोनीने एखादी मोठी कामगिरी केली, मुलाखतीत हजरजबाबीपणाचं दर्शन घडवलं किंवा सामाजिक क्षेत्रात काहीतरी केल्यावर त्याचे चाहत्या तला किंवा तला फॉर अ रिजन हा हँशटॅग ट्रेंड करतात. तला हा एक तमिळ शब्द असून त्याचा अर्थ लीडर, प्रमुख किंवा नेतृत्व करणारा असा होतो. दरम्यान, धोनीने नुकतंच एका कार्यक्रमात जर्सीसाठी ७ हा क्रमांक का निवडला यामागचं कारण स्पष्ट केलं. त्यानंतर पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर तला फॉर अ रिजन (Thala for a reason) हा ट्रेण्ड सुरू झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा