भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी हा गेल्या बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. IPL 2020 च्या निमित्ताने तो चाहत्यांच्या दृष्टीस पडणार होता, पण करोना व्हायरसच्या फैलावामुळे आता त्या गोष्टीसाठी चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पण असे असले तरी धोनी आपल्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असल्याचे दिसून येते. धोनीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रांचीतील लोक ‘लोकल बॉय’ असलेल्या धोनीची एक झलक पाहण्यासाठी वाट बघतात. धोनीदेखील आपल्या चाहत्यांना निराश करत नाही. चाहते धोनीच्या आसपास असले की तो बहुतांश वेळा त्यांची इच्छा पूर्ण करतो. असाच एक प्रकार रांचीमध्ये घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

CoronaVirus : “दुसऱ्या देशांकडून थोडं शिका’; ‘बर्थ डे गर्ल’ सायनाचा चाहत्यांना सल्ला

IPL 2020 च्या तयारीसाठी धोनी आणि इतर खेळाडू चेन्नईमध्ये दाखल झाले होते. तेथे सरावाला सुरूवातदेखील झाली होती, पण IPL चे आयोजन लांबणीवर पडल्याने धोनी पुन्हा स्वगृही परतला. रांचीत परतल्यानंतर धोनीने घरी राहणे पसंत केले नाही. धोनीचे बाईकप्रेम जगजाहीर आहे, त्यामुळे तो रांचीच्या रस्त्यांवर बाईक राईड करताना दिसला. हेल्मेट घालून त्याने रांचीच्या रस्त्यावर एक फेरफटका मारला. त्याच वेळी त्याच्या चाहत्यांनी मात्र त्याला ओळखले अन् त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली.

“स्मिथ धाडकन जमिनीवर कोसळला आणि…”; वॉर्नरने सांगितली आपबिती

Video : रांचीच्या रस्त्यावर धोनीची बाईक राईड

‘चाहत्यांसाठी काहीपण’ हा फंडा असणाऱ्या धोनीनेही आढेवेढे न घेता चाहत्यांना झकास सेल्फी काढून दिले.