भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएल २०२२ची तयारी सुरू केली आहे. धोनी रांचीच्या JSCA स्टेडियममध्ये सराव करत आहे. यादरम्यान धोनीने शूटिंगमध्येही हात आजमावला. धोनीच्या शूटिंगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच धोनीचा नेटमध्ये सराव करतानाचा फोटोही व्हायरल होत आहे.
हातात पिस्तूल घेत धोनी त्याच्या इमेजप्रमाणेच कूल दिसत आहे. धोनीला जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानले जाते. धोनी वेळोवेळी युवा खेळाडूंसोबत आपले अनुभव शेअर करत असतो. सरावासाठी तो रांचीच्या JSCA स्टेडियमवर पोहोचला तेव्हा त्याने तेथील युवा खेळाडूंसोबत आपला अनुभवही शेअर केला.
हेही वाचा – IND vs WI : अभिमान वाटावा असा क्षण..! टीम इंडियासमोर खेळतेय टीम इंडिया; पाहा PHOTO
महेंद्रसिंग धोनी हा देखील आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने आयपीएल २०२२ ची तयारी सुरू केली आहे. धोनीने आयपीएलमध्ये आपल्या संघ चेन्नई सुपर किंग्जला चार वेळा चॅम्पियन बनवले आहे. धोनी आपल्या संघाला पाचव्यांदा चॅम्पियन बनवण्याच्या तयारीत व्यस्त आहे.