MS Dhoni Smashing Sixes Viral Video : भारतात जून महिन्याची सुरवात झाली की, धो धो पाऊस पडायला सुरुवात होते. कारण पावसाठी हंगामात पाऊस पडणार, हे सर्वांनाच माहित असतं. पण क्रिकेटच्या मैदानातलं गणित मात्र काहिसं वेगळं आहे. कारण भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीच्या मनगटात जोपर्यंत ताकद आहे, तोपर्यंत पाण्याचा पाऊस नाही पण षटकारांचा पाऊस मैदानात नक्कीच पडतो. चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या धडाकेबाज फलंदाजीचा व्हिडीओ ट्वीटर हॅंडलवर शेअर केला आहे. आख्ख्या क्रिकेट विश्वात आक्रमक फलंदाजीचा ठसा उमटवणाऱ्या धोनीने षटकारांचा पाऊस कसा पाडला? हे या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. ७ वाजून २९ मिनिटं झालेली असताना धोनीने गोलंदाजांवर तुफान फटकेबाजी केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
चेन्नई सुपर किंग्जने पोस्ट केलेल्या या व्हिडीओला ७ वाजून २९ मिनिटं असं कॅप्शन दिलं आहे. पण हे कॅप्शन देण्यामागे खूप मोठा इतिहास आहे. कारण १५ ऑगस्ट २०२० मध्ये धोनीने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर धोनीने ‘मैं पल दो पल का शायर’ या गाण्याचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करत सूचक कॅप्शन दिलं होतं. मी ७ वाजून २९ मिनिटांपासून निवृत्त झालो आहे, असं तुम्ही समजावं, अशाप्रकारचं कॅप्शन धोनीनं दिलं होतं. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने धोनीचा एक जबरदस्त व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. धोनीचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटलं, थाला अपडेट ७ वाजून २९ मिनिटं.
इथे पाहा व्हिडीओ
धोनीला बाद करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गोलंदाजांचा धोनीने चांगलाच समाचार घेतल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. धोनीने लॉंग ऑफच्या दिशेनं पहिला षटकार ठोकल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तसंच मिड विकेट आणि लॉंग ऑनवरूनही धोनीने मोठे षटकार मारल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. धोनीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 445 k इतके व्यूज मिळाले असून १५ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे. धोनीच्या चाहत्यांना आणि तमामा क्रिकेटप्रेमींना या व्हिडीओच्या माध्यमातून क्रिकेटची एकप्रकारे मेजवाणीच मिळाली आहे.