MS Dhoni bike riding video viral in Ranchi : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा एक व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या घराजवळच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसत आहे. यादरम्यान त्याची एक विंटेज कारही उभी केलेली दिसते. एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. तो आयपीएल २०२४ मध्ये फलंदाज म्हणून खेळला आणि कदाचित पुढचा हंगाम हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धोनीचा बाईक चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल –

महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२४ मध्ये सहभागी झाल्यानंतर अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नात दिसला होता. यानंतर तो सुट्टी घालवण्यासाठी अमेरिकेला गेला होता. एमएस धोनीचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये तो रांची विमानतळावरून बाहेर पडताना दिसत होता. शुक्रवारी एका चाहत्याने धोनी त्याची आवडती बाईक चालवत असताना त्याचा व्हिडीओ बनवला होता. यावेळी त्यांच्या दुचाकीतून धूरही निघत होता. धोनी ज्या रस्त्याने बाईक चालवत होता त्या रस्त्यावर एक विंटेज कार देखील दिसली.

धोनीची आवडता गोलंदाज कोण आहे?

गेल्या महिन्यात महान फलंदाज महेंद्रसिंग धोनीने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते की, जसप्रीत बुमराह हा त्याचा आवडता गोलंदाज आहे. पण त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील आपल्या आवडत्या फलंदाजांची निवड करण्यास नकार दिला. धोनी म्हणाला होता, “माझा आवडता गोलंदाज निवडणे सोपे आहे कारण तो बुमराह आहे. फलंदाज निवडणे अवघड आहे कारण बरेच चांगले फलंदाज आहेत. याचा अर्थ असा नाही की आमचे गोलंदाज चांगले नाहीत.”

हेही वाचा – IND vs BAN : कानपूर कसोटी अनिर्णित राहिली तर टीम इंडिया फायनलमध्ये जाणार का? जाणून घ्या

चेन्नई सुपर किंग्ज धोनीला रिटेन करु शकणार का?

महेंद्रसिंग धोनीच्या भविष्यातील योजनांबाबतही चर्चा जोरात सुरू झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज धोनीला कायम ठेवणार की नाही हा प्रश्न आहे. धोनीच्या निवृत्तीच्या अटकळींदरम्यान ही चर्चा अधिकच रंजक बनली आहे. अनेक अहवालांनुसार, बीसीसीआय एका नवीन योजनेवर विचार करत आहे ज्यामध्ये निवृत्त आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अनकॅप्ड श्रेणीमध्ये ठेवता येईल.

हेही वाचा – IPL मध्ये एका हंगामात २४ कोटी कमावणाऱ्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या; लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत चोपल्या २८ धावा

जर असे झाले तर चेन्नई सुपर किंग्जला धोनीला कायम ठेवणे सोपे तर होईलच पण ते खूपच स्वस्तही होईल. मागील रिटेन्शन पॉलिसी अंतर्गत, अनकॅप्ड खेळाडूला फक्त ४ कोटी रुपयांमध्ये राखले जाऊ शकते, तर चेन्नईने २०२२ मध्ये धोनीला रिटेन करण्यासाठी 12 कोटी रुपये दिले होते. या नवीन धोरणामुळे सुपर किंग्जला मोठा दिलासा मिळू शकतो, जो त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni spotted on bike riding in ranchi video viral ahead ipl 2025 mega auction vbm