ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा सलामीवीर मायकल हसी याला ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग आणि चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्रसिंग धोनी या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळायची संधी मिळाली. त्याने दोन्ही संघात चांगली कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या २००७ च्या विश्वचषक विजेत्या आणि २००६ व २००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघात त्याचा समावेश होता. चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यातही त्याने मोलाचा वाटा उचलला. या दोघांच्या नेतृत्वशैलीबाबत हसीने यू ट्युबवरील एका मुलाखतीत मत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

VIDEO : “दाढी पांढरी झाली रे तुझी”; जेव्हा रैना धोनीची टर उडवतो…

“रिकी पॉन्टींग सगळ्या गोष्टींमध्ये स्पर्धा करत असतो. संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये टेबल टेनिस खेळत असो किंवा गोट्या खेळत असो, पॉन्टींगला सगळ्यात जिंकायचं असतं. सराव सत्रात जर तुम्ही क्षेत्ररक्षणाचा सराव करत असाल, तरी त्याला सगळ्यात पुढे यायचं असतं. कायम सर्वोत्तम कामगिरी करून त्याला इतरांसमोर आदर्श ठेवायचा असतो. संघाचे मानसिक खच्चीकरण करण्यासारखी कोणती गोष्ट घडत असेल, तर तो सर्वात पुढे येऊ साऱ्यांचे मनोधैर्य वाढवतो. तो खेळाडूंना १०० टक्के पाठींबा देतो. त्याबाबतीत तो धोनीसारखा आहे”, असे हसीने सांगितलं.

माईक हसी

“सेहवाग कायम सचिन, द्रविडच्या सावलीत लपला”; पाकिस्तानी खेळाडूचं मत

“धोनी अत्यंत शांत आहे. त्याच्या डोक्यात गणितं तयार असतात. धोनीच्या योजना रिकी पॉन्टींगपेक्षा अधिक सरस असतात. धोनीला सामन्याची समज चटकन येते. पॉन्टींगच्या योजनाही कामी येतात. पण धोनीच्या योजना अधिक प्रभावशाली ठरतात, कारण तो काही योजना आयत्या वेळी मैदानावर ठरवतो. अनेकदा आम्हाला वाटतं की हे धोनी काय करतोय? पण अखेरीस त्याचा निर्णय बरोबर ठरतो. हे सारं कुठून येतं…? तो त्याच्या मनाची हाक ऐकतो असं मला वाटतं. दोघे भिन्न स्वभावाचे कर्णधार आहेत, पण दोघे आपापल्या पद्धतीने प्रभावशाली आहेत”, असे हसीने स्पष्ट केले.