Mahendra Singh Dhoni Viral Video: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १६ व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) ला त्याच्या नेतृत्वाखाली विजय मिळवून दिल्यानंतर महेंद्रसिंग धोनी रांची येथील त्याच्या घरी त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. दरम्यान, धोनीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात तो चाहत्यांसोबत किंवा विंटेज कार चालवताना दिसत आहे. आयपीएल हंगाम संपल्यानंतर लगेचच धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सध्या तो रिहॅब प्रक्रियेतून जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार रांचीमध्ये अनेकवेळा फिरताना दिसला. दरम्यान, गेल्या आठवड्यात जेव्हा तो विंटेज कार पॉन्टियाक फायरबर्ड (१९७३) चालवताना दिसला, तेव्हा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आता धोनीचा एका चाहत्यासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्याशी बोलताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या कारमध्ये बसला आहे. दुसरीकडे, बाईकवरील २ चाहत्यांनी त्याच्या विजयाच्या चिन्हासह फोटो काढण्याची विनंती केली, तेव्हा धोनीने लगेचच त्यांना होकार दिला. यावेळी धोनी कारच्या पॅसेंजर सीटवर बसला होता.

धोनीने चेन्नईला ५व्यांदा चॅम्पियन बनवले –

महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, ४२ वर्षीय धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तथापि, धोनी अजूनही सक्रिय क्रिकेटपटू आहे आणि तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे नेतृत्व करतो. अलीकडेच फ्रँचायझीने त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२३ चे विजेतेपद पटकावले. संघाने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

आयपीएलच्या पुढील हंगामात धोनी खेळण्याची शक्यता वाढली –

महेंद्रसिंग धोनीची कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी आयपीएलच्या १६ व्या हंगामातही पाहायला मिळाली. गुडघ्याचा त्रास असतानाही धोनीने एकही सामना चुकवला नाही आणि सर्व सामन्यात कर्णधारपद भूषवत संघाला विजेतेपद मिळवून दिले. आता २०२३ मध्ये होणाऱ्या पुढील आयपीएल हंगामात धोनीच्या खेळण्याच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. त्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाल्यानंतर पुढील हंगामात तो चेन्नईचे कर्णधारपद भूषवताना दिसणार असल्याचे मानले जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni taking selfie with fans in ranchi video goes viral vbm