24 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. 2 टी-20 आणि 5 वन-डे असं या दौऱ्याचं स्वरुप असेल. या मालिकेतला पहिला टी-20 सामना रविवारी विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवला जाईल. या मालिकेसाठी टीम इंडियाने नेट्समध्ये कसुन सराव केला. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेमध्ये विश्रांती घेऊन पुनरागमन करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीनेही फलंदाजीचा सराव केला. याचसोबत महेंद्रसिंह धोनी, उमेश यादव हे खेळाडूही नेट्समध्ये सराव करताना दिसले.

2 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, कृणाल पांड्या, विजय शंकर, सिद्धार्थ कौल, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मयांक मार्कंडे

Story img Loader