MS Dhoni watching ind vs pak live match Video : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज (रविवार) भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबई येथील आंदरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागलेले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा देखील या हाय व्होल्टेज सामन्याचा आनंद घेताना दिसून आला.

एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान एमएस धोनी या सामन्याचा आनंद घेत असल्याचे दिसून आले. धोनीचा बॉलीवूड अभिनेता सनी देओलसह सामना पाहातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दोघेही चाहत्यांच्या गराड्यात बसून गप्पा मारताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाची जर्सी घातल्याचे दिसत आहे. यावरून काही जणांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काही नेटकऱ्यांनी यावरून धोनीला ट्रोल करत भारतीय संघाला सपोर्ट करताना सीएसकेची जर्सी घातल्यावरून टीका देखील केली आहे.

एका युजरने धोनी दुसऱ्या संघाची जर्सी घालून पाकिस्तानला सपोर्ट करत असल्याचे म्हटले आहे.

भारत पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास या समान्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान यांनी नाणेफेक जिंकली आणि त्याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीला बाबर आझम चांगल्या लयीत दिसून आला. त्याने सुरूवातीलाच पाच चौकार देखील लगावले, न्यूझीलंडविरोधतील सामन्यात बाबरने ८१ चेंडू खेळून अर्धशतक पूर्ण केले होते.

बाबर आझम भारताविरोधात चांगली धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच हार्दिक पांड्याने त्याला बाद केले. गुड लेंथच्या चेंडूवर शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बाबरने विकेटकिपर के एल राहुलकडे एक सोप्पा झेल देत त्याची विकेट गमावली. बाबर आऊट झाल्यानंतर हार्दिक पांड्याने त्याला बाब-बाय करत सेंड ऑफ दिला.

बाबर आऊट झाल्यानंतर इमाम उल हक देखील २६ चेंडू खेळून बनवलेल्या १० धावांच्या स्कोअरवर आऊट झाला. अक्सर पटेलच्या परफेक्ट थ्रोमुळे इमामला तंबूत परतावे लागले. ४७ धावांवर पाकिस्तानने दोन विकेट गमावल्याने संघ दबावाखाली आल्याचे पाहायला मिळाले. माझ मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांच्या जोडीने ५० धावांची भागिदारी करत पाकिस्तानची धावसंख्या १००च्या पुढे नेली.

पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांच्यात शतकी भागीदारी झाली. पण भारताच्या गोलंदाजांनी संघाला फार धावा करण्याची संधी दिली नाही. भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानला सामन्यात टिकू दिलं नाही.

भारताकडून कुलदीपने ९ षटकांत ४० धावांत ३ विकेट घेत सामन्याचा रोखच बदलला. तर हार्दिकने ८ षटकांत ३१ धावा देत २ विकेट्स घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. तर हर्षित राणाने, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

Story img Loader