MS Dhoni Wife Sakshi Taught Stumping Rule: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंग करण्याचा विक्रम तर आहेच, पण त्याच्यापेक्षा वेगवान स्टंपिंग करणारा क्वचितच कोणी यष्टीरक्षक असेल. पण मात्र त्याची पत्नी साक्षीच त्याला एकदा स्टंपिंगचे धडे देत होती. याची माहिती खुद्द धोनीने दिली आहे. एम एस धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो सांगतो की, त्याची पत्नी साक्षीने एकदा मॅच पाहताना स्टंपिंगवर वाद घातला होता.

साक्षीने धोनीला वाईड बॉलवर स्टंपिंग शक्य आहे की नाही हे समजावून सांगायला सुरुवात केली. धोनीने नो बॉलवर स्टंपिंग होत नाही असे सांगितल्यावर साक्षी म्हणाली, “तुला काहीच माहीत नाही.” फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतला आणि दुसरा फलंदाज क्रीझवर आला. तरीही साक्षी वाईडवर स्टंपिंग होऊ शकते हे मान्य करायला तयार नव्हती. मुलाखतीतील हा किस्सा ऐकताच प्रेक्षक मंडळींमध्ये एकच हशा पिकला होता.

हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…

धोनी हा किस्सा सांगताना म्हणाला, “आम्ही घरी बसून सामना पाहत होतो. एक सामना चालू होता, बहुधा वनडे सामना होता. साक्षीही सोबत होती. सहसा साक्षी आणि मी क्रिकेटबद्दल बोलत नाही. त्यामुळे गोलंदाजाने चेंडू टाकला आणि तो वाईड देण्यात आला. फलंदाज तो चेंडू खेळण्यासाठी क्रीझवर पुढे गेला आणि स्टंपिंगमुळे बाद झाला. पंच रिव्ह्यू घेतात की थर्ड अंपायर योग्य निर्णय देतील. पण इथे साक्षी बोलायला लागली की तो आऊट नाही आहे.

हेही वाचा – Gary Kirsten Resigned: पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, अवघ्या ६ महिन्यातच गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षकपदाचा दिली राजीनामा, काय आहे कारण?

साक्षीच्या वाक्यावर धोनी म्हणाला, “फलंदाज आऊट नाही हे ती बोलेपर्यंत फलंदाज मैदानाबाहेर चालू लागला. ती म्हणाली तू बघ त्याला परत बोलवतील. वाईड बॉलवर स्टंपिंगने बाद होऊच शकत नाही. मी म्हणालो की वाईड बॉल असल्यावर स्टंपिंगवर आऊट दिलं जातं फक्त नो बॉल असल्यावर देत नाहीत. तर साक्षी म्हणाली की तुला काहीच माहीत नाही. थांब, थर्ड अंपायर परत बोलावतील. ही चर्चा सुरू असतानाच तो बिचारा फलंदाज सीमारेषेजवळ पोहोचला होता. तरीही ती हेच बोलत होती त्याला परत बोलवतील तो आऊट नाहीय. तो बाद झाल्यानंतर जेव्हा त्याच्या जागी दुसरा फलंदाज आला तेव्हा ती म्हणाली नाही काहीतरी गडबड आहे.”