आयपीएल २०२२ चा हंगाम चांगलाच वादळी ठरला. या हंगामात नव्याने पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्स या संघाने जेतेपद पटकावले. दरम्यान, सर्व फ्रेंचायझी आगामी आयपीएल हंगामासाठी तयारीला लागल्या असून चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाविषयीची मोठी माहिती समोर आली आहे. सीएसके संघ आयपीएलचा आगामी हंगाम महेंद्रसिंह धोनीच्याच नेतृत्वातच खेळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ही माहिती दिली आहे.
इनसाईड स्पोर्ट या क्रीडाविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने याबाबत अधिक माहिती दिली आहे. या माहितीनुसार आयपीएल २०२३ हंगामामध्ये सिएसके संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनी करणार आहे. “आम्ही आमच्या भूमिकांमध्ये कोणताही बदल केलेला नाही,” असे विश्वनाथन यांनी संघाच्या कर्णधारपदाविषयी बोलताना सांगितले आहे. आयपीएल २०२१ मधील हांगामात चेन्नई संघामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. हंगामाच्या सुरुवातीलाच महेंद्रसिंह धोनीने संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे सोपवले होते. मात्र जडेजाच्या नेतृत्वात संघाने खराब कामगिरी केल्यामुळे सीएसकेची धुरा पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीकडे सोपवण्यात आली होती.
हेही वाचा >> भारत-पाक महामुकाबल्यात पाकिस्तानचा ‘हा’ दिग्गज गोलंदाज नसणार, टीम इंडियाच्या फलंदाजांना मोठे फटके मारता येणार?
धोनीच्या नेतृत्त्वात सीएसकेने चार वेळा जेतेपद पटकावलेले आहे. मात्र २०२२ साली चेन्नई संघ गुणतालिकेत वरचे स्थान गाठू शकला नाही. संघाने रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात खेळलेल्या आठ सामन्यांपैकी सहा सामने गमावले होते.
हेही वाचा >> भारताचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर? होणार मोठी शस्त्रक्रिया
दरम्यान, आयपीएलच्या आगामी हंगामात सीएसके संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडेच असल्यामळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. आयपीएलच्या पुढील हंगामातही महेंद्रसिंह धोनी मैदानावर खेळताना दिसणार आहे.