मायदेशातील गेल्या काही मालिकांवर वर्चस्व गाजविल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता परदेशात जाऊन दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आपला जलवा दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. पण या दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयसीसीच्या या वर्षांतील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर धोनीने मोहोर उमटवली आहे. तसेच आयसीसीच्या वार्षिक एकदिवसीय आणि कसोटी संघातही त्याने स्थान मिळवले आहे. एकदिवसीय संघाचे नेतृत्वही त्याच्याकडे सोपवण्यात आले आहे. वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि एकदिवसीय क्रिकेटपटू या पुरस्कारांसाठी धोनीला मानांकने मिळाली आहेत.
एलजी आयसीसीच्या वर्षांतील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर (पीपल्स चॉइस अ‍ॅवॉर्ड) भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाव कोरले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती पत्करणाऱ्या सचिन तेंडुलकरनंतर या पुरस्कारावर मोहोर उमटवणारा धोनी हा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
२०१०मध्ये पहिलावहिला लोकप्रिय क्रिकेटपटूचा पुरस्कार सचिनने पटकावला होता. त्यानंतर २०११ आणि २०१२मध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकाराने हा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर हा मानाचा पुरस्कार प्राप्त करणारा धोनी हा तिसरा क्रिकेपटू ठरला आहे. या वर्षी मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया), अ‍ॅलिस्टर कुक (इंग्लंड), विराट कोहली (भारत), ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) यांना धोनीने मागे टाकले. बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी धोनीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
२०१० मध्ये बंगळुरू येथे हा पुरस्कार वितरण समारंभ झाला होता. या वर्षी लोकप्रिय क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी २ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एक लाख ८८ हजार क्रिकेटरसिकांनी कौल दिला होता.

narendra modi
पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील साहित्य संमेलनाचे उद्घाटन
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Gondavalekar Maharaj punyatithi mahotsav ,
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यतिथी महोत्सव गोंदवल्यात सुरू
Narhari Zirwal On Chhagan Bhujbal
Narhari Zirwal : “छगन भुजबळांसाठी पुढे मोठा विचार होणार असेल म्हणून…”, अजित पवार गटाच्या नेत्यांचं सूचक विधान
Loksatta Lokankika Pankaj Tripathi is the chief guest in the grand finale Mumbai news
महाअंतिम फेरीत पंकज त्रिपाठी प्रमुख पाहुणे; राज्यातील सर्वोत्तम ‘लोकसत्ता लोकांकिका’ २१ डिसेंबरला ठरणार
four districts of east vidarbha will be deprived of ministerial posts
पूर्व विदर्भातील चार जिल्हे मंत्रीपदापासून वंचित राहणार
Rishabh Pant Becomes 3rd Indian Keeper To Complete 150 Dismissals in Just 41 Matches IND vs AUS
IND vs AUS: ऋषभ पंतने गाबा कसोटीत घडवला इतिहास, १५० चा आकडा पार करत धोनी-द्रविडच्या मांदियाळीत मिळवलं स्थान
Banganga Revival Project, Harbor Engineering,
मुंबई : बाणगंगा पुनरुज्जीवन प्रकल्प, रामकुंड जतनासाठी ‘हार्बर इंजिनीअरिंग’
Story img Loader