MS Dhoni’s photo with brother viral: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटविश्वात सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. त्याच्या जन्मापासून ते त्याच्या शाळेपर्यंत आणि टीम इंडियाच्या पदार्पणापर्यंतची गोष्ट प्रत्येक चाहत्याला माहीत आहे. धोनीवर बनवलेल्या बायोपिक चित्रपटाने त्याच्या आयुष्यातील अनेक पैलू चाहत्यांना दाखवले. पण धोनीच्या मोठ्या भावाबद्दल फार कमी प्रसंगी बोलले गेले आहे. गुरुवारपासून सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनी पहिल्यांदाच भावासोबत दिसत आहे.
नरेंद्र सिंग धोनीपेक्षा १० वर्षांनी मोठा –
धोनीच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये फक्त त्याच्या बहिणीचे पात्र दाखवण्यात आले होते. सोशल मीडियावर धोनी आणि त्याच्या भावाचा एकत्र फोटो कधीच दिसला नाही. त्यामुळेच धोनीला नरेंद्र सिंह धोनी नावाचा मोठा भाऊही आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. नरेंद्र हा अनुभवी क्रिकेटपटूपेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. धोनीचा बायोपिक समोर आला, तेव्हा अनेकांनी सांगितले की, नरेंद्र सिंगला मुद्दाम या चित्रपटात दाखवण्यात आले नाही. एमएस धोनी आणि नरेंद्र यांच्या नात्यात तणाव असल्याच्या बातम्या नेहमीच येत होत्या.
दोन्ही भाऊ पहिल्यांदाच एकत्र दिसले –
आता त्यांचे नाते सुधारले आहे असे दिसते. धोनीचा एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो त्याचा भाऊ आणि बालपणीच्या मित्रासोबत शेतात दिसत आहे. धोनी त्याच प्रिंटेड शर्ट आणि पँटमध्ये दिसला. त्याच्या शेजारी नरेंद्रसिंग धोनी उभा आहे. पांढऱ्या टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या ट्राऊजरमध्ये नरेंद्र सिंह धोनी अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहे.
हेही वाचा – MLC 2023: अंबाती रायुडू आणि ड्वेन ब्राव्हो सीएसकेच्या ‘या’ फ्रेंचायझीसाठी खेळणार, पाहा संपूर्ण संघ
चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया –
यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. दोन्ही भावांना एकत्र पाहून काहींना आनंद झाला तर काहींनी धोनीच्या भावाला ओळखणे खूप अवघड असल्याचे सांगितले. त्याच वेळी, काही वापरकर्त्यांनी असा अंदाज लावला की कदाचित आता दोन्ही भाऊ एकत्र राहू लागले आहेत.
सीएसकेने धोनीच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली –
एमएस धोनी त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. धोनी अलीकडेच आयपीएलमध्ये २०० हून अधिक सामन्यांमध्ये फ्रँचायझीचे नेतृत्व करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. एमएस धोनी २५० सामन्यांमध्ये खेळणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला क्रिकेटपटू आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने IPL २०२३ च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करून विक्रमी पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली.