करोना विषाणूने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. खेळाडूंपासून ते सहाय्यक कर्मचारी वृंदापर्यंत सारेच घरी आहेत. अनेक लोकप्रिय समालोचकदेखील सध्या क्रीडा स्पर्धा नसल्याने घरात आहेत. याच दरम्यान समालोचक आकाश चोप्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटूशी लाइव्ह संवाद साधला. त्यावेळी त्या क्रिकेटपटूने महेंद्रसिंग धोनीबरोबरचे काही किस्से सांगितले.
“आयुष्यात एकदाच कॉफी प्यायलो, ‘स्टारबक्स’पेक्षाही महाग पडली”
महेंद्रसिंग धोनीने २००७ च्या टी २० विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून दिले. याच संघात भारताचा माजी खेळाडू रूद्र प्रताप सिंग याचा समावेश होता. समालोचक आकाश चोप्रा याने नुकतेच आर पी सिंगशी लाइव्ह चॅटच्या माध्यमातून संवाद साधला. त्यात रूद्र प्रताप सिंगने आपली धोनीशी असलेली मैत्री आणि इतर गोष्टींबाबत माहिती दिली. रुद्र प्रताप सिंग याने टी २० विश्वचषकात उत्तम कामगिरी केली होती, पण त्यानंतर मात्र त्याला फारशी कामगिरी करता आली नाही. पण धोनीशी आपली मैत्री अजूनही कायम आहे, असे त्याने सांगितले.
रूद्र प्रताप सिंग (आर पी सिंग)
विराट की तेंडुलकर? युवराज की धोनी?… लाईव्ह चॅटवर रंगला ‘रॅपिड फायर’चा खेळ
“आम्ही सुरूवातीच्या काळात अनेक वेळा एकत्र वेळ घालवायचो आणि खूप गप्पा मारायचो. त्यानंतर त्याला कर्णधारपद मिळाले आणि त्याची कामगिरी उंचावत गेली. मी मात्र माझ्या कामगिरीत सातत्य राखू शकलो नाही. पण आमची मैत्री मात्र अजूनही अगदी तशीच घट्ट आहे. आम्ही अजूनही एकत्र असलो की गप्पा मारतो आणि मनसोक्त भटकतो. फक्त क्रिकेटबाबत आमची मत काहीशी वेगळी आहेत”, असे आर पी सिंगने सांगितले.
“आमच्याकडून पैसे मागण्यापेक्षा दहशतवादावरचा खर्च बंद करा”
रूद्र प्रताप सिंग याने कारकिर्दीत चांगली सुरूवात केली होती. त्याने १४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० टी २० सामने खेळले. भारताचे प्रतिनिधित्व करताना त्याने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी २० विश्वचषक २००७ मध्ये दमदार कामगिरी केली होती. प्रतिस्पर्धी संघातील सलामीवीरांना माघारी धाडण्यात तो बहुतांश वेळी यशस्वी झाला होता. याशिवाय IPL स्पर्धेतदेखील त्याने दमदार कामगिरी करून दाखवली. त्याने स्विंग गोलंदाजीचा एक चांगला आदर्श तत्कालीन युवा गोलंदाजांपुढे घालून दिला होता, पण त्याच्या त्या प्रयत्नांनी त्याला फार फायदा झाला नाही. कारण खूप चांगली कामगिरी करूनदेखील त्याला टीम इंडियामध्ये पुनरागमन करता आले नाही. अखेर निवृत्ती स्वीकारून त्याने समालोचन करण्यास सुरूवात केली.