IPL 2024 Auction: चेन्नई सुपर किंग्जचे नाव ऐकल्यावर पहिला चेहरा समोर येतो तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी (एम.एस. धोनी). याचे उदाहरण आयपीएल लिलावात सीएसकेच्या रणनीतीवरूनही दिसून येते. सीएसकेच्या सीईओ यांनी आयपीएल २०२४च्या लिलावात संघाची रणनीती काय होती, यावर सूचक वक्तव्य केले. त्यांनी त्यांच्या रणनीती बाबत सांगितले की, “संघाने एम.एस. धोनीला हवे असलेले सर्व खेळाडू विकत घेतले.” आयपीएल लिलावाची आठवण करून, आनंदी सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या योजना उत्तम प्रकारे कशा प्रकारे पूर्ण केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीएसकेने ट्वीटरवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये, सीएसकेचे सीईओ म्हणाले की, “संघाने मिनी-लिलावात चांगले खेळाडू निवडले. ‘थला’ धोनीला हवे असलेले सर्व खेळाडू मिळाले,” यावर त्यांनी प्रकाश टाकला. एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ मध्ये संघ चांगली कामगिरी करेल असा त्यांना विश्वास आहे. सीईओंनी सकारात्मक निकालाची आशा व्यक्त केली. महेंद्रसिंग धोनी गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे, गेल्या मोसमात त्याने फार कमी सामन्यांमध्ये दीर्घ फलंदाजी केली होती. याविषयी बोलताना ते म्हणाला की, “मी एमएसडीची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक आहे.”

काशी विश्वनाथ पुढे म्हणाले की, “चाहत्यांचीही अशीच अपेक्षा होती आणि त्यांचा अंदाज होता की धोनी फलंदाजी करेल. यावर्षी त्यांचे स्वप्न पूर्ण होईल. हे येणारे वर्ष खूप चांगले जाईल कारण, यावेळी धोनीकडे त्याला आवडते खेळाडू संघात आहेत. सीएसकेच्या प्रत्येक बोलीमागे धोनीचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे आम्ही खूप निवांत असतो.”

शार्दुलला ४ कोटींना विकत घेतले

मिचेलशिवाय सीएसकेने रचिन रवींद्रला १.८० कोटींना खरेदी केले. त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. शार्दुल ठाकूरसाठी संघाने ४ कोटी रुपये खर्च केले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवीसाठी चेन्नईने तिजोरी उघडली. संघाने रिझवीला ८.४० कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये होती.

हेही वाचा: IPL 2024: रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार? CSK सीईओंनी दिले उत्तर; म्हणाले, “आम्ही त्यांना संपर्क…”

मुस्तफिजुर रहमान देखील सीएसके मध्ये

चेन्नई सुपर किंग्जने बांगलादेशचा अनुभवी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानलाही विकत घेतले. रेहमानची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. चेन्नईने त्याला बेस किंमतीवरच दोन कोटींमध्ये खरेदी केले. त्याच्याशिवाय भारतीय यष्टीरक्षक फलंदाज अरावेली अवनीशचाही चेन्नईने संघात समावेश केला आहे. त्यांच्यासाठी २० लाख रुपये खर्च करावे लागले.

रिटेन केलेले खेळाडू: एम.एस. धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), मोईन अली, दीपक चाहर, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, राजनाथ चौधरी, राजनाथ पाटील. शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश तिक्षणा.

लिलावात विकत घेतले: रचिन रवींद्र (१.८० कोटी), शार्दुल ठाकूर (४ कोटी), डॅरिल मिचेल (१४ कोटी), समीर रिझवी (८.४० कोटी), मुस्तफिजुर रहमान (२ कोटी), अरावेली अवनीश (२० लाख).

हेही वाचा: IPL 2024 Auction: कमिन्स, स्टार्कवर एवढी रक्कम खर्च केल्याबद्दल अनिल कुंबळेने नाराजी व्यक्त केली; म्हणाला, “ हा मूर्खपणा…”

भूमिकेनुसार संपूर्ण टीम

सलामीवीर: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र

मध्यक्रम: समीर रिझवी, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शेख रशीद, अरावेली अवनीश

अष्टपैलू: रवींद्र जडेजा, डॅरिल मिचेल, मोईन अली, शिवम दुबे, निशांत सिंधू, अजय मंडल

वेगवान गोलंदाज: दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना, मुकेश चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, मुस्तफिजुर रहमान.

फिरकीपटू : महेश तिक्षणा, मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी

संभाव्य प्लेईंग११

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एम.एस. धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), दीपक चहर, महेश तिक्षणा, मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे/शार्दुल ठाकूर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhonis mind was behind every bid of csk chennai ceo revealed avw
Show comments