Shivam Dube on MS Dhoni: भारतीय संघात अष्टपैलू युवा खेळाडू म्हणून शानदार कामगिरी करत असलेला शिवम दुबेची सध्या क्रिकेट वर्तुळात खूप चर्चा सुरू आहे. टी-२० मालिकेत शिवम दुबेने अफगाणिस्तानविरुद्ध सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या फलंदाजीमुळे तो चाहत्यांचा आणि क्रिकेट विश्लेषयकांचा लाडका खेळाडू ठरला आहे. २०२४च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी तो प्रबळ दावेदार आहे. दुबेने आपल्या यशाचे श्रेय एम.एस. धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जला दिले, परंतु प्रत्यक्षात धोनीच्या छोट्या सल्ल्याने त्याचे करिअर बदलले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा माजी क्रिकेटपटू अभिनव मुकुंदने दावा केला की धोनीने दुबेला शॉर्ट बॉलवर मोठा फटका न मारण्याचा सल्ला दिला होता. मुकुंद म्हणाला, “एका सहकाऱ्याने मला सांगितले की दुबेचे एम.एस. धोनीशी संभाषण झाले आहे आणि त्याने त्याला सांगितले की, शॉर्ट बॉलवर मोठे फटके मारणे हे रॉकेट सायन्स नाही पण प्रत्येक शॉर्ट बॉलवर मारणे ही चुकीची रणनीती आहे.”

दुसऱ्या टी-२० नंतर दुबेने आपल्या खेळी बद्दल सांगितले. तो म्हणाला, “मी चांगली प्रगती करत असताना माझ्या कामगिरीत सुधारणा झाल्याचा आनंद आहे. माझ्याकडे असलेले कौशल्य ही देवाची देणगी आहे आणि मी त्यातील चुकांवर खूप काम केले आहे. मी माझ्या खेळातील अनेक विभागांमध्ये काम केले असून त्यात सुधारणा केल्या आहेत. मी केलेल्या सुधारणांमुळे आज चांगली कामगिरी करत आहे.” रविवारी दुसऱ्या टी-२० सामन्यात ३२ चेंडूत नाबाद ६३ धावा करताना, दुबेने चार षटकार आणि पाच चौकार मारले आणि भारताने २६ चेंडू बाकी असताना १७३ धावांचे लक्ष्य पार केले. ३४ चेंडूत ६८ धावा करणाऱ्या यशस्वी जैस्वालही चर्चेत आहे.

दुबे पुढे म्हणाला, “भूतकाळात मी भविष्याबद्दल खूप विचार केला आहे. पण मला हे जाणवले आहे की मला वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मला माझे कौशल्य अजून कसे सुधारता येईल यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, त्यामुळे माझ्यासाठी हे अधिक महत्त्वाचे आहे. मी फक्त स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असून मला काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा: Ranji Trophy: मुंबईच्या सामन्यानंतर अजिंक्य रहाणेचे सूचक विधान; म्हणाला, “भारतासाठी १०० कसोटी खेळणे…”

चांगल्या गतीने टाकलेल्या शॉट बॉलविरुद्ध दुबे अनेकदा अडखळतो. देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलमधील वेगवान गोलंदाजांचा दर्जा खूपच चांगला असल्याचे त्याने मान्य केले. आखूड टप्प्याच्या चेंडूंविरुद्ध खेळात सुधारणा करण्यासाठी त्याने केलेल्या कामाबद्दल दुबे म्हणाला, “मी यावर खूप काम केले आहे. जेव्हा मी देशांतर्गत क्रिकेट खेळत होतो, तेव्हा मी सर्व गोलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकत होतो, पण जेव्हा आयपीएलमध्ये आलो तेव्हा मला थोडा त्रास झाला. भारतीय क्रिकेटमध्ये, हे सोपे नव्हते कारण, तशा खेळपट्ट्या भारतात नव्हत्या. आता आहेत त्यामुळे गोलंदाज १४० किमी/तास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत होते. मला त्यांच्या गोलंदाजीवर पूल शॉट मारणे खूप अवघड होत होते. मी त्यावर खूप काम केले, परंतु त्याआधी मी माझ्या मानसिकतेवर काम केले, ते अधिक महत्वाचे होते.”

शिवमला विचारले गेले की त्याने कोणत्या पद्धती वापरल्या ज्यामुळे सुधारणा झाली, तेव्हा तो म्हणाला, “याचे श्रेय चेन्नई सुपर किंग्ज आणि माही भाई (एम.एस. धोनी) यांना जाते कारण, माझ्यामध्ये आत्मविश्वास नेहमीच होता. धोनी भाईने माझ्यामध्ये बदल घडवून आणला. त्यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले आणि सांगितले की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. स्टीफन फ्लेमिंग आणि माईक हसीने यांनीही माझ्यावर विश्वास दाखवला आहे.

हेही वाचा: IND vs AFG: तिसऱ्या टी-२० मध्ये संजू सॅमसनला मिळू शकते संधी, जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-११

फिनिशर म्हणून त्याच्या मानसिकतेबद्दल बोलताना दुबे म्हणाला, “मध्यम फळीतील फलंदाज म्हणून माझी भूमिका फिरकीपटूंविरुद्ध मोठे फटके खेळणे आणि स्ट्राइक रेट सुधारणे ही आहे. पण जेव्हा २०-२५ धावा करण्याचा विचार येतो तेव्हा मी डाव पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित करतो. माही भाईला जे करताना मी खूपवेळा पाहिले आहे, त्या दिशेने मी काम करत आहे. मला स्वतःला शांत ठेवावे लागेल आणि एका वेळी एका चेंडूवर लक्ष केंद्रित करावे लागेल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhonis small advice changed shivam dubes career he said this about short ball avw