Mukesh Kumar became the second Indian player to debut in all three formats in the same tour: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना कॅरेबियन संघाने चार धावांनी जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सहा गडी गमावत १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला नऊ गडी गमावून केवळ १२५ धावा करता आल्या. दरम्यान या सामन्यात मुकेश कुमारने एक खास कारनामा केला आहे. तो हा पराक्रम भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाकडून दोन खेळाडूंनी पदार्पण केले. या सामन्यात मुकेश कुमार आणि तिलक वर्मा यांना पदार्पणाची कॅप मिळली. या सामन्यापूर्वी भारताची टी-२० कॅप मिळवून, वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने एक विक्रम केला, जो त्याच्या आधीच फक्त एका भारतीय क्रिकेटरच्या नावावर होता. आता तो दोघांच्या नावावर झाला आहे.

मुकेश कुमारने एकाच दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि नंतर टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा मुकेश हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याच्या आधी, हा कारनामा यॉर्कर स्पेशालिस्ट टी नटराजनने केला होता. त्याने २०२०-२१ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या पहिल्या टी-२० सामन्यात ३ षटके गोलंदाजी करताना २४ धावा दिल्या.

हेही वाचा – Deodhar Trophy 2023: दक्षिण विभागाने २१ वर्षांनी देवधर ट्रॉफीवर कोरले नाव, ४५ धावांनी उडवला पूर्व विभागाचा धुव्वा

सामन्याबद्दल बोलायचे, तर पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली. यजमान वेस्ट इंडिजने भारताला रोमहर्षक सामन्यात चार धावांनी पराभूत केले. विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या संघाने २० षटकांत ६ बाद १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला १५० धावांचे सोपे लक्ष्य गाठता आले नाही आणि २० षटकात ९ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.