Mukesh Kumar is emotional with memory of his father after being selected in he Indian team: १२ जुलैपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा कसोटी आणि वनडे संघ जाहीर केला आहे. या दोन्ही संघातही मुकेश कुमारची निवड झाली आहे. या निवडीनंतर पश्चिम बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार भावूक झाला. तेव्हा त्याला आपल्या दिवंगत वडिलांची आठवण झाली. यानंतर दोन्ही संघात झालेल्या मुकेश कुमारन प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसोटी संघात निवड झाल्यानंतर मुकेश कुमारने म्हणाला, की, त्याची प्रगती पाहून त्याचे दिवंगत वडील आनंदी असतील. २९ वर्षीय तरुणाने त्याच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्याच्या सर्व मित्रांचे आभार मानले. तो म्हणाला की सौरव गांगुली, जॉयदीप मुखर्जी आणि त्याचे गुरू रणदेब बोस यांनी त्याला नेहमीच कसोटी क्रिकेटमध्ये मार्गदर्शन केले. त्याचा विश्वास आहे की त्यांच्या मदतीशिवाय तो हे करु शकला नसता.

‘माझे स्वप्न आता माझ्यासमोर आहे’ – मुकेश कुमार

मुकेश कुमार टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखचतीत म्हणाला की, “माझे स्वप्न आता माझ्यासमोर आहे. मला नेहमीच भारतासाठी कसोटी खेळायची इच्छा होती आणि शेवटी मी पोहोचलो. मला खात्री आहे की आता माझी प्रगती पाहून बाबा नक्कीच खूश असतील. मम्मी, पप्पा यांचा पाठिंबा राहिल. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि माझ्या सोबत नेहमी राहिल्याबद्दल सर्व मित्रांचे धन्यवाद. सौरव गांगुली सर, जॉयदीप (मुखर्जी) सर आणि माझे गुरू रणदेब बोस सर, ज्यांनी मला नेहमी कसोटी क्रिकेटमध्ये मार्गदर्शन केले. त्यांच्या मदतीशिवाय मी हे करू शकलो नसतो.”

हेही वाचा – IND vs WI: सरफराज आणि अभिमन्यूची निवड न झाल्याने वसीम जाफर संतापला, बीसीसीआयच्या निवडकर्त्यांना विचारले तीन प्रश्न

श्रीलंकेविरुद्ध प्रथम संधी मिळाली होती –

डिसेंबर ३०३३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी मुकेशला पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघात बोलावण्यात आले होते. त्याने ३९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २१.५५ च्या सरासरीने १४९ बळी घेतले आहेत. तसेट सहावेळा पाच बळी घेतले आहेत. २९ वर्षीय वेगवान गोलंदाज, जो २०२३ आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता, त्याने दहा सामन्यांमध्ये ४६.५७ च्या सरासरीने आणि १०.५२च्या इकॉनॉमी रेटने सात विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh kumar is emotional with memory of his father after being selected in he indian team for west indies tour vbm
Show comments