Mukesh Kumar taking his first international wicket video went viral: त्रिनिदाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज संघांत कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियासाठी पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमारने कसोटी क्रिकेटमध्ये पहिली विकेट घेतली आहे. दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी मुकेश कुमारने विरोधी संघातील नवोदित क्रिक मॅकेन्झीला इशान किशनकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशाप्रकारे मुकेशच्या नावावर कसोटीत पहिली विकेट नोंदवली गेली आहे, ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इशान किशनने शानदार झेल टिपला –

हे दृश्य ५२ व्या षटकात पाहिला मिळाले. मुकेश कुमारने डावखुरा फलंदाज मॅकेन्झीला चेंडू टाकला अन् त्याने तो कट करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक इशान किशनच्या दिशेने गेला. इशानने येथे कोणतीही चूक न करता उत्तम झेल घेत मॅकेन्झीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. क्रिक मॅकेन्झीला ५७ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३२ धावा करून बाद झाला.

पहिली विकेट घेताच मुकेशच्या आनंदाला राहीला नाही पारावर –

कसोटीत पहिली विकेट मिळताच मुकेशने आनंदाने उडी घेतली. भारतीय स्टार विराट कोहलीनेही त्याला मिठी मारून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर संघातील इतर सदस्यांनीही त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे त्याने विकेट घेताच पावसाला सुरुवात झाली. जणू ते या गोलंदाजाला त्याच्या संघर्षानंतर यश मिळाल्याबद्दल अभिनंदन करत होते. पावसामुळे सामना थांबवण्यात आला.

मुकेश कुमारने केलेली कामगिरी सामान्य क्रिकेट चाहत्यांनासाठी कदाचित विशेष नसेल, पण एक क्रिकेटपटू म्हणून त्याला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत आणि त्यानंतरही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट आता लक्षात राहील. मुकेश कुमार हा बिहारच्या गोपालगंजचा रहिवासी आहे. आयपीएल २०२३ मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी ७ विकेट घेतल्या. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी उत्कृष्ट होती, त्यामुळे एका साध्या कुटुंबातून आणि छोट्या शहरातून आलेल्या मुकेशने टीम इंडियाचा प्रवास केला. अनफिट शार्दुल ठाकूरच्या जागी त्याचा या सामन्यात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – Zifro T10 2023: मोहम्मद हाफीजने रचला इतिहास! अवघ्या दोन षटकांत केला ‘हा’ मोठा पराक्रम

सामन्याबद्दल बोलायचे, तर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिज संघाने ५ विकेट गमावत २२९ धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे वेस्ट इंडिज भारतापेक्षा २०९ धावांनी मागे आहे. वेस्ट इंडिजकडून अॅलिक अथांजे आणि जेसन होल्डर नाबाद परतले. अॅलिक एथंजे १११ चेंडूत ३७ धावा खेळत आहे, तर जेसन होल्डर ३९ चेंडूत ११ धावा करून नाबाद आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये सहाव्या विकेटसाठी ६५ चेंडूत २१ धावांची भागीदारी झाली.