Abhimanyu Eswaran upset after missing double century : इराणी चषक २०२४ मध्ये मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या डावात अभिमन्यू ईश्वरनचे दुहेरी शतक हुकले. रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळत असलेल्या अभिमन्यूला शुक्रवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात शम्स मुलानीने झेलबाद केले. त्यावेळी ईश्वरन १९१ धावांवर खेळत होता आणि त्याचे द्विशतक अवघ्या ९ धावांनी हुकले. ज्यानंतर नाराज झालेल्या अभिमन्यूने रागाने बॅट आपटली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रेस्ट ऑफ इंडियाच्या डावातील १०३ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्वीप शॉट खेळताना २९ वर्षांचा अभिमन्यू झेलबाद झाला. त्याचा झेल तनुष कोटियनने घेतला. द्विशतक हुकल्याची निराशा अभिमन्यूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आऊट होताच त्याने रागाच्या भरात बॅट जमिनीवर आपटली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…

अभिमन्यूने २९२ चेंडूत १६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १९१ धावांची खेळी केली. त्याने ध्रुव जुरेलसोबत पाचव्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी केली. यानंतर ध्रुव जुरेलचेही शतक हुकले. भारताकडून अद्याप न खेळलेला ईश्वरन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दुलीप ट्रॉफीच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याने भारत-बीसाठी शतके झळकावली आणि आता इराणी चषक सामन्यातही त्याने १९१ धावा केल्या आहेत. त्यामुळे तो लवकरच टीम इंडियासाठी खेळताना दिसू शकतो.

हेही वाचा – आघाडीनंतर मुंबईची पडझडइ; इराणी चषक लढत रंगतदार स्थितीत; दिवसअखेर २७४ धावांनी पुढे

सामन्याबद्दल बोलायचे तर, मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्फराझ खानच्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर ५३७ धावा केल्या होत्या. सर्फराझ खानने २८६ चेंडूचा सामना करताना ४ षटकारल आणि २५ चौकारांच्या मदतीने नाबाद २२२ धाावांचे योगदान दिले. यानंतर प्रत्युत्तरात रेस्ट ऑफ इंडियाने अभिमन्यूच्या १९१ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावा केल्या. ज्यामुळे आता मुंबई संघाने दुसऱ्या डावात ८ बाद १८७ धावा करत ३०८ धावांची आघाडी घेतली आहे.