Irani Cup 2024 Devdutt Padikkal took Prithvi Shaw catch video viral : इराणी चषक २०२४ चा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईचा रणजी चॅम्पियन संघ आणि रेस्ट ऑफ इंडिया आामनेसामने आहेत. या सामन्यात रेस्ट ऑफ इंडिया संघाकडून खेळत असलेल्या देवदत्त पडिक्कलने अप्रतिम झेल घेत संघाला पहिले यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देवदत्त पडिक्कलने हवेत झेप घेत स्लिपमध्ये मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉचा अप्रतिम झेल टिपला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात ढगाळ वातावरणामुळे रेस्ट ऑफ इंडियाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या तासात कर्णधाराचा हा निर्णय बऱ्याच अंशी योग्य ठरला. कारण तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉला मुकेश कुमारने बाद केले. पृथ्वी शॉ कव्हरच्या दिशेने शॉट मारण्याच्या प्रयत्नात होता आणि चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलने उजवीकडे हवेत झेप मारून पकडला. त्याने एका हाताने वेगवान चेंडू पकडून संघाला यश मिळवून दिले.

देवदत्त पडिक्कलने घेतला पृथ्वी शॉचा अप्रतिम कॅच –

देवदत्त पडिक्कलने भारतासाठी कसोटी पदार्पण केले आहे आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. सध्या तो कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असून गरज पडल्यास त्याला टीम इंडियामध्ये पुन्हा संधी मिळू शकते. मात्र, तो सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघापासून दूर आहे. एका कसोटी सामन्यात ६५ धावा करण्यात तो यशस्वी ठरला होता. त्याला केवळ एका डावात फलंदाजीची संधी मिळाली होता. हा सामना या वर्षी मार्चमध्ये धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध खेळला गेला होता. २०२१ मध्ये, त्याने श्रीलंका दौऱ्यावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि दोन डावात ३८ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : १३ वर्षीय फलंदाजाने केला मोठा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले वादळी शतक

मुंबई (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), सर्फराझ खान, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, एम जुनेद खान, मोहित अवस्थी

हेही वाचा – IND vs BAN : रविचंद्रन अश्विनची ऐतिहासिक कामगिरी! आतापर्यंत जगातील कोणत्याच खेळाडूला न जमलेला केला पराक्रम

रेस्ट ऑफ इंडिया (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुधरसन, इशान किशन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, मुकेश कुमार, प्रसीद कृष्णा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mum vs roi devdutt padikkal flies like a superman to dismiss prithvi shaw catch video viral in irani cup 2024 vbm