अजिंक्य रहाणे-पृथ्वी शॉची बेधडक सुरूवात, शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगेच्या भागीदारीच्या जोरावर मुंबई संघाने विदर्भचा ६ विकेट्सने आणि ४ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सध्या उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवले जात आहे. यामध्ये मुंबई विरूद्ध विदर्भ असा अटीतटीचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भ संघाने २२१ धावांचा डोंगर उभारला. मुंबईच्या या विजयात अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉची सुरूवात निर्णायक ठरली. या दोघांनी ६ षटकांत ८२ धावा केल्या आणि मुंबईच्या विजयाचा पाया रचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विदर्भ संघाने प्रथम फलंदाजी करताना २२१ धावांचा डोंगर उभारला. विदर्भ कडून अथर्व तायडेने ६६ धावा, करूण नायरने २६ धावा सुरुवात करून दिली. यानंतर अपूर्व वानखेडे आणि शुभम दुबे यांनी चांगली भागीदारी रचत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. अपूर्व वानखेडेने झंझावाती अर्धशतक झळकावले तर शुभम दुबेने ४३ धावांचे योगदान दिले. या फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विदर्भाने मोठी संख्या उभारली आणि मुंबई संघाला विजयासाठी २२२ धावांचे मोठे आव्हान दिले. मुंबईकडून अथर्व अंकोलेकरने २, सूर्यांश शेडगेने २ तर तुश कोटियनने एक विकेट मिळवली. तर विदर्भकडून दिपेश परवानीने २, हर्ष दुबेने १ आणि यश ठाकूरने १ विकेट घेतली.

हेही वाचा – PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार

मुंबई संघाकडून अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांची जोडी फलंदाजीला उतरली. पृथ्वीच्या सुरुवातीपासूनच आपल्या जुन्या फॉर्मत परतल्याचे दिसून त्याने पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने २६ चेंडूत ४९ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर वादळी फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेचे थोडक्यासाठी शतक हुकले. अजिंक्य रहाणेने तीन षटकार आणि दहा चौकारांच्या मदतीने ४५ चेंडू ८४ धावांची मॅच विनिंग खेळी केली. यानंतर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या महत्त्वाच्या सामन्यात फेल ठरले. यानंतर शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे यांनी चांगली भागीदारी रचत मुंबई संघाला चार चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवून दिला. सूर्यांश शेडगेने अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. मुंबई संघाने प्रत्युत्तरात ४ बाद २२४ धावा केल्या. अजिंक्य रहाणे च्या या मॅच विनिंग खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

हेही वाचा – १३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज

विदर्भ संघाच्या २२१ धावा आणि मुंबईने केलेल्या २२४ धावा म्हणजेच एकूण ४४५ धावा अशी मोठी धावसंख्या या टी-२० सामन्यात उभारली गेली. जी मुंबई वि विदर्भच्या सामन्यांतील सर्वात मोठी धावासंख्या आहे.