आठवडय़ाची मुलाखत : समीर दिघे, मुंबईच्या रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रणजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू समीर दिघे यांची निवड करण्यात आली. मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा मुकुट सांभाळताना नेमके काय करायला हवे, अपेक्षांची पूर्ती कशी करायला हवी, खेळाडूंकडून चांगली कामगिरी कशी करवून घ्यायला हवी, याबाबत दिघे यांच्याशी खास बातचीत केली. या वेळी त्यांनी बदललेली पिढी, त्यामुळे त्यांच्या कलेने घेत त्यांना जबाबदारीची जाणीव कशी करून देता येईल, मुंबईचा ‘खडूस’पणा कसा टिकवता येईल, यावर चर्चा केली.
* मुंबईचे प्रशिक्षकपद स्वीकारताना मनात काय होते?
मुंबईसारख्या बलाढय़ संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यापूर्वी आपण खेळाडूंसाठी काय करू शकतो, हे मनाशी ठरवलेले होते. मुंबईकडून नेहमीच जास्त अपेक्षा असतात. काहीही करून मुंबई जिंकायलाच हवी, याचे दडपणही असते. सध्याच्या घडीला अन्य संघही चांगली कामगिरी करीत आहेत. मुंबईच्या संघातही चांगली गुणवत्ता आहे. पण पूर्वीपासून जी प्रथा चालत आली आहे, ते कायम राखण्याचे दडपण असते. त्या तोडीची कामगिरी करायला काय गरजेचे आहे, याचाही विचार केला. सध्याच्या घडीला प्रशिक्षणामध्येही बदल झालेला आहे. सध्याच्या घडीला प्रशिक्षक कोणत्याही खेळाडूवर दबाव आणू शकत नाही, आणत नाही. पण त्याच्या खांद्यावर हात ठेवून जर त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली, तर ते अधिकपणे त्याला समजू शकेल. संघात सुदृढ वातावरण असावे आणि मुलांना स्वातंत्र्य द्यायला हवे. खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यामध्ये मैत्रीचे नाते असायला हवे. कोणताही संघ प्रशिक्षकामुळे जिंकत नाही, तो खेळाडूंच्या कामगिरीमुळेच जिंकतो. पण त्या खेळाडूंना प्रशिक्षक कसे मार्गदर्शन करतो, हे महत्त्वाचे ठरते.
* मुंबईचे प्रशिक्षकपद सांभाळणे हा काटेरी मुकुट असतो, असे तुम्हाला वाटते का?
हो, नक्कीच. मुंबईने महान खेळाडू दिले आहेत. सर्वात जास्त वेळा रणजी जेतेपदे जिंकली आहेत. त्यामुळे मुंबईकडून नेहमीच फार अपेक्षा असतात व त्या अपेक्षांची पूर्ती तुम्हाला करावीच लागले. मुंबई जाणूनबुजून हरली असे कधीच झाले नाही. हा सरतेशेवटी खेळ आहे. जिंकण्याची अपेक्षा असणे गैर नाही. पण हे दडपण तुम्ही कसे हाताळता, ते महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये संघाकडून चुका झाल्या, त्या सुधारणे गरजेचे आहे. खेळाडूंना आपली जबाबदारी माहिती आहे. मला फक्त त्यांच्याकडून परिस्थितीनुरूप चांगली कामगिरी करून घ्यायची आहे.
* मुंबईचा संघ काही वर्षांपूर्वी ‘खडूस’ समजला जायचा, पण आता तो काही प्रमाणात लुप्त झाला, असे वाटते का?
मुंबईचे खेळाडू खडूस नाहीत, असे मी म्हणणार नाही. मुंबईचे खेळाडू खडूस आहेत, पण खेळाचे स्वरूप बदलले आहे. काही वर्षांपूर्वी मी ४० धावा करणारच, भले त्यासाठी १०० चेंडू खेळेन, असे होते. पण आत्ताची पिढी म्हणते की, मी १० चेंडूंत ४० धावा करीन. त्यामुळे मुंबईचा खडूसपणा गेलेला नाही. आयपीएल, एकदिवसीय सामन्यांमुळे खेळ बदलला आहे. पूर्वी ‘गुड लेंथ’ चेंडूवर फलंदाज बचाव करायचे, पण आताचे खेळाडू त्याच चेंडूवर मोठे फटकेही मारतात. पूर्वी एक खेळाडू दीड दिवस खेळायचा, पण आता उपाहारापर्यंत १०० धावाही होतात. क्रिकेट हा खेळ सारखाच आहे, पण त्याची पद्धत बदलली आहे. खेळाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे.
* काही वर्षांपासून मुंबईच्या संघात काही गट पडले आहेत, असे दिसते. त्याबाबत तुम्ही कोणती पावले उचलणार आहात?
माझे त्यांना एकच म्हणणे आहे की, तुम्ही मैदानावर एकत्र असायला हवे. प्रत्येकाला पाठिंबा द्यायला हवा. आनंदाबरोबरच दु:खातही तुम्ही एकत्र असायला हवे. सरतेशेवटी मैदानाबाहेर तुम्ही काय करता, ही तुमची वैयक्तिक गोष्ट आहे. ज्याच्याशी माझे विचार जुळतात, त्याच्याबरोबर मी राहीन, पण काही लोक त्याला गटबाजी म्हणत असतील, तर ते योग्य ठरणार नाही. १५ खेळाडूंनी रोज एकत्र राहायला हवे, हे अशक्य आहे. मुंबईच्या खेळाडूंमध्ये एकी नाही, असे मला वाटत नाही.
* तुमच्याकडे प्रशिक्षकपदाचा पुरेसा अनुभव नाही, असे म्हटले जाते. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
मुंबईकडून मी १३ वर्षे खेळलोय, हा सर्वात मोठा अनुभव आहे. दिग्गज खेळाडूंना पाहिले आहे, त्यांच्याबरोबर खेळलो आहे. बीसीसीआयच्या अकादमीमध्ये मी सहा वर्षे काम केले आहे. या अकादमीमध्ये प्रशिक्षण देत असताना बऱ्याच खेळाडूंमधील गुणवत्ता हेरली आहे, गुणवत्तेला पैलू पाडण्याचे काम केले आहे. त्रिपुरासारख्या संघाला मार्गदर्शनही केले आहे. मी हाँगकाँगचाही प्रशिक्षक होतो. आयपीएलमधील मुंबई इंडियन्समध्ये मी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही, असे म्हणता येणार नाही.
* यापुढची मुंबईसोबतची वाटचाल कशी असेल, त्यासाठी काय विशेष प्रयत्न तुम्ही केले आहेत?
मुंबई मी कधीच सोडली नाही, दुसरीकडे खेळलो नाही. मुंबईची क्रिकेट सुधारणा समिती, व्यवस्थापकीय समिती, निवड समिती यांचा नेहमीच मला पाठिंबा मिळाला आहे. प्रत्येक ठिकाणी काम करताना दडपण असतेच. माझ्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे, तर त्यांच्याही माझ्याकडून अपेक्षा असणार. हे नक्कीच एक आव्हानात्मक काम आहे. मला संघात भीती निर्माण करायची नाही, तर संघाची एकत्रितपणे मोट बांधायची आहे. गुणवत्ता असूनही काही खेळाडू परिस्थिती न जोखता आल्यामुळे मागे पडलेले दिसतात. त्यामुळे परिस्थिती समजून घेऊन त्या वेळी उचित काय करता येईल, हे पाहणे माझे काम असेल. जिंकणे, हे महत्त्वाचे आहे. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, त्यामुळे अथक मेहनत घ्यावीच लागेल. चुका सुधाराव्या लागतील आणि विजयात सातत्य राखायला लागेल.