पहिल्या दिवशीच्या बिकट अवस्थेतून कर्णधार अजित आगरकर आणि मोसमातील एकमेव द्विशतकवीर आदित्य तरे यांच्या नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या दिवसावर निर्विवाद वर्चस्व राखत ६ बाद ३८० अशी मजल मारली आहे. या दमदार फलंदाजीच्या जोरावर ३९ वेळा रणजी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलेल्या मुंबईने अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
आगरकर आणि तरे यांनी सातव्या विकेटसाठी २११ धावांची अभेद्य भागीदारी रचत सेनादलाच्या गोलंदाजीची हवा काढून टाकली. दोघांनीही संयमी आणि कोणतीही जोखीम न उठवता धावसंख्या वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
यापूर्वी २००२ साली लॉर्ड्सवर आगरकरने शतक झळकावले होते. या सामन्यात सिन्हाच्या गोलंदाजीवर ‘मिड ऑन’ला एकेरी धाव घेत आगरकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथ्या शतकाला गवसणी घातली. आगरकरने यावेळी २६४ चेंडूंचा सामना करताना २९४ मिनिटे फलंदाजी करत १२ चौकारांच्या जोरावर नाबाद ११३ धावांची खेळी साकारली. तर तरेने त्याला सुयोग्य साथ देत ३२४ चेंडूंत १६ चौकारांच्या जोरावर नाबाद १०८ धावांची खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १४३ षटकांत ६ बाद १४३ (अजित आगरकर नाबाद ११३, आदित्य तरे नाबाद १०८, अभिषेक नायर ७०, सचिन तेंडुलकर ५६ ; सूरज यादव २/४९) वि. सेनादल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा