मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीत विजयी आघाडी घेत शरद पवार यांच्या बाळा म्हाडदळकर गटाने बाजी मारली आहे.
दरम्यान, क्रिकेट फर्स्ट पॅनला पाठिंबा दर्शविलेल्या शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख आणि एमसीएचे सदस्य असलेले उद्धव ठाकरे यांनी मुलगा आदित्य ठाकरेसह मतदान केले. तर, मुंबईच्या माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मतदानाचा अधिकार बजावला. काँग्रेस नेते नारायण राणे मात्र परदेशात असल्यामुळे मतदानाला उपस्थित राहू शकले नाहीत. एकूण ३२९ सदस्यांपैकी ३२१ जणांनी मतदान केले आहे.
एमसीएचे अध्यक्षपद कायम राखण्यात शरद पवारांना यश
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीच्या निकालाचा कल हाती येणास सुरूवात झाली आहे.
First published on: 17-06-2015 at 07:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai cricket association election