Mumbai Cricket On Sarfaraz Khan: सरफराज खानची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली नव्हती. सरफराज खानने रणजी ट्रॉफी २०२३च्या मोसमात खूप धावा केल्या, परंतु असे असूनही तो टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकला नाही. त्यानंतर सुनील गावसकर आणि वसीम जाफरसह अनेक दिग्गजांनी संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले. खराब फिटनेस आणि शिस्तीमुळे सरफराज खानची भारतीय संघात निवड झाली नसल्याचा दावा बीसीसीआयच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. यावर आता मुंबई क्रिकेटचे स्पष्टीकरण आले आहे.

सरफराज खानला भारतीय संघात न घेणे हे त्याच्या फिटनेस आणि शिस्तीच्या मुद्द्यांशी निगडीत होते परंतु मुंबई क्रिकेटमधील सूत्रांनी सांगितले की, “अशा दाव्यांमध्ये तथ्य नाही.” बीसीसीआयच्या एका विभागामध्ये असे मानले जाते की सरफराजला त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा करण्याची तसेच, मैदानावर आणि बाहेर थोडी अधिक शिस्तबद्ध राहण्याची आवश्यकता आहे. मुंबई क्रिकेटशी संबंधित लोकांनी मात्र या बीसीसीआयचे हे आरोप फेटाळून लावले असून त्यांनी सरफराजची पाठराखण केली आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

रणजीमध्ये दिल्लीविरुद्ध शतक झळकावले होते

सरफराज खानने गेल्या मोसमात दिल्लीविरुद्ध शतक झळकावल्यानंतर ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवत आक्रमकपणे सेलिब्रेशन केले. त्याचे हे कृत्य शिस्तभंग करणारे होते असे मानले गेले. सरफराजची ही पद्धत त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका निवड समितीला एक इशारा मानली गेली होती. क्रिकेटपटूच्या जवळच्या एका सूत्राने सोमवारी पीटीआयला सांगितले की, “दिल्लीतील रणजी सामन्यादरम्यान सरफराजचे सेलिब्रेशन त्याचे सहकारी आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्यासाठी होते.”

हेही वाचा: Ravi Shastri: टीम इंडियाच चोकर झाली आहे का? भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणाले, “फक्त एक व्यक्ती…”

शतक साजरे करण्याचा फलंदाजाचा हक्क

सूत्राने सांगितले की, “प्रशिक्षक मजुमदार यांनी सरफराजच्या शतकाचे आणि सेलिब्रेशनचे कौतुक करण्यासाठी आपली टोपीही काढली होती. त्यावेळी मैदानात तत्कालीन निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा नव्हे सलील अंकोला स्टेडियममध्ये उपस्थित होते. सरफराजने शानदार शतक झळकावून दबावाच्या परिस्थितीत असणाऱ्या संघाला बाहेर काढले आणि हे सेलिब्रेशन त्याच्यासाठी होते.” सूत्राने पुढे सांगितले की, “मोकळेपणाने सेलिब्रेट करणे चुकीचे आहे का? तेही ज्यावेळी तुम्ही तुमच्या ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवत असाल. त्याने कधीही क्रिकेटचा अनादर केला नाही बीसीसीआयला फक्त एक कारण हवं.”

प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी सरफराज खानची केली पाठराखण

याशिवाय मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यातील सामन्यात सरफराज खान ज्या पद्धतीने वागला त्यावर मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित खूश नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, चंद्रकांत पंडित यांनी सरफराज खानची पाठराखण करत त्याच्या खेळीचे कौतुक केले आहे, ते त्याला नेहमीच मुलासारखं मानतात. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने सांगितले की, “चंदू सर नेहमी सरफराज खानला आपल्या मुलाप्रमाणे वागवत असत. तसेच, ते सरफराज खानला गेल्या १४ वर्षांपासून ओळखतात. तसेच, चंद्रकांत पंडित सरफराज खानवर कधीही रागावू शकत नाहीत, असा दावा या सूत्राने केला आहे. अशा सर्व गोष्टी केवळ मूर्खपणाच्या आहेत.”

हेही वाचा: Team India: सचिन, गांगुली अन् द्रविडसोबत खेळणारा ‘हा’ ‘फ्लॉप क्रिकेटर’ आज झाला करोडपती

सरफराजने यो-यो टेस्ट उत्तीर्ण केली आहे

सरफराजच्या जवळच्या लोकांना मात्र हे जाणून घ्यायचे आहे की, एक शतक झळकावूनही भारतीय निवड समितीचे त्याचेकडे दुर्लक्ष का झाले” भारतीय संघातील तंदुरुस्तीचे प्रमाण १६.५ (यो यो टेस्ट) आहे आणि त्याने ते साध्य केले आहे. क्रिकेटच्या फिटनेसबद्दल सांगायचे तर, त्याने अनेक वेळा दोन दिवस फलंदाजी केली आणि नंतर दोन दिवस क्षेत्ररक्षण केले.