मुंबईचा युवा क्रिकेटपटू सिद्धार्थ मोहितेने कमाल केली आहे. सिद्धार्थने दीर्घ काळ फलंदाजी करत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले. त्याने नेट्समध्ये ७२ तास पाच मिनिटे सलग फलंदाजी करत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले.

याआधी क्रिजवर सतत फलंदाजी करण्याचा विक्रम विराग माने यांच्या नावावर होता, त्यांनी २०१५ साली ५० तास फलंदाजी केली होती. मात्र, १९ वर्षीय सिद्धार्थ मोहितेने आता त्यांचा विक्रम मोडला आहे. ”मला नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते. यामुळेच त्याला सतत फलंदाजी करण्याची प्रेरणा मिळाली”, असे सिद्धार्थने म्हटले.

”मी जे करण्याचा प्रयत्न करत होतो ते मी करू शकलो याचा मला खूप आनंद आहे. माझ्या आत नक्कीच काहीतरी आहे हे मला लोकांना दाखवायचे होते. कोविड लॉकडाऊनमुळे माझी दोन मौल्यवान वर्षे वाया गेली जी माझ्यासाठी खूप मोठी हानी होती. मला नेहमीच काहीतरी वेगळे करायचे होते”, असेही सिद्धार्थ म्हणाला.

हेही वाचा – महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : तंदुरुस्त स्मृतीचा दिलासा; भारताची विंडीजवर मात

या विक्रमाच्या वेळी सिद्धार्थ मोहितेला मार्गदर्शक ज्वाला सिंग यांनी मार्गदर्शन केले. ज्वाला यांनी यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाललाही प्रशिक्षण दिले आहे.